आपली लढाई लबाड लोकांशी आहे - चित्राताई वाघ
पाथरी - पाच वर्षापासून सत्तेवर आलेल्या लोकांनी देशात महागाई बेकारी वाढविली,:तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सत्तेवर आलेल्या लबाड लोकांशी आपली लढाई आहे असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार राजेश दादा विटेकर यांच्या प्रचारार्थ पाथरी येथील जाहीर सभेत मंगळवार 9 एप्रिल रोजी केले.
यावेळी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीेच्या अध्यक्षा भावनाताई नखाते, नगराध्यक्षा मीनाताई भोरे, पंचायत समिती पाथरीच्या सभापती शिवकन्या ताई ढगे, कमलताई राठोड ,यमुनाताई रासवे ,कल्पनाताई थोरात, वनिता ताई चव्हाण, रेखाताई निकाळजे, सुनंदाताई फलके ,मीराताई सरोदे आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या चित्राताई वाघ पुढे म्हणाल्या की मोदी सरकारने गॅस दिले पण ते भरण्यासाठी गरिबांनी आठशे रुपये आणायचे कसे ?असा सवालही सत्ताधाऱ्यांना विचारला. दिवाळीत गोरगरीब जनतेच्या चुली पेटू नये म्हणून राशनचे तेल ,साखर बंद केले. देशात महागाई वाढवली, तरुणांच्या हाताला काम मिळत नाही ,अशी परिस्थिती आज देशाची झालेली आहे .महाराष्ट्र सक्षमीकरण करण्याचे काम फक्त शरद पवार साहेबांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद केंद्रात वाढवण्यासाठी आपणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांना विजय करावयाचे आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ भावनाताई नखाते म्हणाल्या महाराष्ट्रात दुष्काळ असताना सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.जातीपातीचे राजकारण करून आपली मतांची पोळी भाजण्याचे काम जातीयवादी पक्ष करीत आहेत. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला सह अनेक महिला उपस्थित होत्या