कोरोना
प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध
जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 1921 पर्यंत चालले. जगाची विभागणी दोन गटात झाली.साम्राज्यवाद हे पहिल्या महायुधदाचे मूळ कारण. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, आदी दोस्त राष्ट्रानी जर्मनीवर जे जुलमी प्रतिबंध लादले यातूनच दुसर्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.
पराभवाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जगावर राज्य निर्माण करण्यासाठी जर्मनीचा हुकूमशहा अडालफ हिटलरने जगावर दुसरे महायुद्ध लादले.
पराभवाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि जगावर राज्य निर्माण करण्यासाठी जर्मनीचा हुकूमशहा अडालफ हिटलरने जगावर दुसरे महायुद्ध लादले.
1939 मध्ये सुरु झालेले महायुद्ध सर्वात भीषण होते. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या महनगरावर अणुबॉम्ब टाकले.एका क्षणात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. लाखो लोक कायमचे अपंग झाले. जपान उध्वस्त झाला. आणि दुसरे महायुद्ध संपले. ते अनेक दूरगामी परिणाम करुन.
या दोन्ही महायुद्धात लढले ते सैनिक. भारतीय त्या वेळेस इंग्रज सैनिकासोबत होते. आपण इंग्रजांचे गुलाम होतो. आधुनिक तंत्रज्ञान, नवनवे शस्त्र, विमाने, युध्दनौका, आणि मानवी संहारक अणुबॉम्बचा या युद्धात वापर केला गेला.
सध्याही जगात महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन मधून कोरोना विषाणूंचा संसर्ग असा पसरला. बघता बघता या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे.
ज्यावेळी चीनमध्ये या विषाणूने हजारो लोकांचे बळी घेतले होते. त्यावेळी कुणालाही वाटले नाही की हा विषाणू जगभर थैमान घालेल.
जग या महामारीला संपविण्यासाठी लढाई लढत आहे. महासत्ता अमेरिका हतबल झाली आहे. युरोपातील देश सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
जगात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या 14 लाखांहून अधिक वाढली आहे. अमेरिका,फ्रान्स, इटली, स्पेन येथे मृतांचा आकडा दहा हजारांचा पार पडला आहे.
जग अक्षरश थांबले आहे. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. बाजारपेठा बंद करून लोकांना सुरक्षित कसे करता येईल याकडे सरकार कामाला लागले आहेत. आर्थिक मंदी निर्माण झाली आहे.
भारतातही या विषाणू विरुद्ध युध्द सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने आवश्यक पावले उचलली. हवाई वाहतूक बंद करून बाहेरुन लागण झालेल्या व्यक्ती येणार नाहीत याची काळजी घेतली. या महामारीवर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण लाँकडाऊन घोषित केला.
लाॅकडाऊन नंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महानगरे ओस पडत आहेत. शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले गोर गरीब आपले घर जवळ करीत आहेत. मुंबई, दिल्ली येथून लाखो कामगार, हातावर पोट असणारी माणसं मिळेल त्या वाहनाने, वाहने बंद झाल्यावर शेकडो मैल उपाशी तापाशी लेकरा बाळाला घेऊन घर गाठत आहेत.
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने कोणीही घराबाहेर पडणार नाहीत. घरात रहा कोरोनाला हरवा. यासाठी प्रत्येक नागरिकाना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की या महामारी विरुद्ध हे युद्ध आहे. या महायुद्धात प्रत्येक नागरिक एक सैनिक म्हणून लढत आहे.
हे कोरोना विषाणू विरूद्ध असे महायुद्ध आहे. ज्या महायुद्धात जगातील प्रत्येक नागरिक सहभागी झाला आहे. हातात कोणतेही शस्त्र न घेता.
यासाठी युद्धातील आघाडीचे सैनिक आहेत ते डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, अधिकारी, कर्मचारी, शासन, प्रशासन आणि शेवटी नागरिक.
नागरिक मग तो कोणत्याही जाती धर्माचे असो. कोणत्याही पंथाचा असो. गरीब असो किंवा करोडपती असो. कोरोनाने कुणालाही सोडले नाही.
हा विनाशकारी काळही उद्या नक्कीच संपणार आहे. एक सैनिक जसे आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्व पणाला लावतो. तशी वेळ आली आहे. आता लोकांनी सोशल डिसटंसिंगचा नियम पाळावा. घराबाहेर पडू नये. घराबाहेर जाताना मास्क वापरावा. या युद्धात विजय नक्की आपलाच आहे.
रानबा गायकवाड
9420148538
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा