संविधान बचाव, देश बचाव अभियान; विद्यार्थी नेता कन्हैया कुमारची पाथरीत जाहीर सभा.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठमधील विद्यार्थी नेता कन्हेया कुमार यांची २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पाथरी जिल्हा परिषदेच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. माझ्या आयोजनातील या सभेला धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांच्या सर्व पक्षाचा सहभाग असणार आहे. त्यानिमित्ताने आज पाथरी नगर परिषदेच्या सभागृहात सर्वपक्षीय नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड तसेच इतर बहुजन विचारांच्या पक्ष-संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अँड.अमोल गिराम यांच्यासह इतरांनी आपले विचार मांडले.
सध्याची देशाची परिस्थिती पाहता देशात अघोषित आणीबाणी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या भारतीय राज्य घटनेने आपल्याला मूलभूत स्वातंत्र व अधिकार दिले, याच भारतीय राज्य घटनेला धोक्यात आणणारा कारभार हुकूमशाही व वर्ण वर्चस्ववादी प्रवृत्ती चालवताना दिसत आहे. एवढंच नाही तर संविधान जाळल्याच्या देशद्रोही घटना होत असताना अशांवर कारवाई सुद्धा होत नाही.
देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध तसेच सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या व धार्मिक विद्वेष निर्माण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तीविरुद्ध कणखरपणे पुढे येण्याची आवश्यकता आहे.
दिल्ली येथील JNU विद्यापीठाचा लोकप्रिय विद्यार्थी नेता कन्हेया कुमार यांनी संविधान बचाव! देश बचाव!! अभियान चालवले आहे. यानिमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमात पाथरीसह मानवत, सोनपेठ व सेलू परिसरातील विद्यार्थी, जागरूक तरुण व संवेदनशील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ.बाबाजाणी दुर्रानी यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा