पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड.
महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान
बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा उपक्रम.
पाथरी (धम्माल उजगरे) राज्यातील ज्या बाजार समीतीचे कामकाज उत्तम आहे अशा बाजार समीतीची महाराष्ट्र शासन पणन महामंडळाने पुरस्कारासाठी निवड केली असुन पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती चा या पुरस्कारा मध्ये सामावेश असल्याने बाजार समिती चे सभापती अनिलराव नखाते ,संचालक मंडळ व कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र शासन पणन महामंडळ च्या वतीने राज्यातील बाजार समितीचे घटत चाललेले उत्पन्न यामुळे बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात आले आहे या समित्यांमध्ये सुधारणा करणेसाठी स्पर्धा लागावी म्हणून ज्या बाजार समितीचे कामकाज उत्तम आहे आशा बाजार समित्यांना पुरस्कार देणे बाबतची घोषणा सहकार,पणन व वस्रउद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली असुन चांगले उत्पन्न घेऊन त्या प्रमाणात अंशदान योजनेच्या भरणा करणाऱ्या पुरस्कार बाजार समितीमध्ये पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड केली आहे.हि बाब पाथरीकरांठी निश्चित अभिमानाची आहे.पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी संचालक मंडळ ,कर्मचारी ,व्यापारी आणि शेतकरी यांच्याशी समन्वयाची भुमिका ठेवुन केलेले कामकाजाची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे असे म्हणता येईल.बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांनी माेठ्या विश्वासाने विक्रीसाठी आणलेल्या शेतीमालाबाबत योग्य न्याय दिला गेला आहे.शेतमालाला चांगले दर मिळण्यासाठी शेतमालतारण याेजना अधिक प्रभावीपणे राबविली आहे .तसेच शेतमाल तारण कर्ज वाटप अंतर्गत व शेतमालाचे पैसे वेळेवर देणे साठीचा पाठपुरावा केला गेला हि बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वपुर्ण ठरली आहे.
या पुरस्कार निवडीमुळे बाजार समीती प्रशासनात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
*नखाते यांचे कामकाज पुरस्कारास पात्र.*
कृउबास चे सभापती अनिलराव नखाते अनेक प्रशासनातील कामकाज हे पुरस्काराठी पात्र च असते हि बाब बाजार समितीच्या पुरस्कार निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाली. वाल्मिकी अर्बन बँकेला अनेक पुरस्कार मिळाले ,वाल्मिकी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांना केंद्रशासनाकडुन अटल टिंकरींग लँब मंजुर झाली.बाजार समीतीचे कामकाज उत्तम प्रकारे सुरू आहे यावरून नखाते यांचे कामकाज म्हणजे पुरस्कारास पात्र असे समिकरण बनले असे म्हणणे सोईचे होईल.
*६% दराने तारण १ कोटी कर्ज वाटप करणारी राज्यातील पहिली बाजार समीती.*
बाजार समीतीचे कामकाज आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असुन शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेल्या सोयाबीन व हरभरा या शेतमालाला योग्यभाव मिळे पर्यंत शेतकऱ्यांच्या या मालाची गोदामात साठवण करून त्या शेतमालावर अत्यल्प असे ६ % व्याजदराने ९७ शेतकऱ्यांना १ कोटी रूपये तारण कर्ज वाटप करणारी पाथरी बाजार समिती हि राज्यातील एकमेव बाजार समीती आहे अशी माहिती सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.तसेच मिळालेला पुरस्कार हा संचालक मंडळ ,सचिव बि.एस.कुटे,कर्मचारी, आडतदार व व्यापारी आणि शेतकरी यांचे सामुहिक यश आहे अशी प्रतिक्रिया सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा