रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

राजेशदादा तुम्ही खासदार होणार व खासदार झाल्यानंतर सुद्धा नौकरी मेळावा घेत रहा- आ.बाबाजानी दुर्राणी

राजेशदादा तुम्ही खासदार होणार व खासदार झाल्यानंतर सुद्धा नौकरी मेळावा घेत रहा- आ.बाबाजानी दुर्राणी.

 परभणी/प्रतिनिधी_ग्रामिण भागातील गरजू तरुणांना नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणीत नोकरी महोत्सवचे आयोजन केले होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या आयोजनातील हा पहिलाच नोकरी महोत्सव अतीशय यशस्वीरीत्या पार पड़ला.

       बँकिंग, फार्मसी, मॅनुफॅक्चरींग, टेलिकॉम, आयटी, ईन्शुरन्स अशा विविध क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ५२ कंपन्यांचे एचआर प्रतीनिधी थेट परभणीत आले. ज्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील एकुण ४८०० तरुणांच्या मुलाखती घेतल्या. आणि निवड प्रक्रीयेअंती १२०० उमेदवारांची जागेवर निवड झाली तर, १८०० उमेदवारांना पुणे, नागपुर, औरंगाबाद, ठाणे, मुंबई, नांदेड़ याठिकाणी सेकंड राउंडसाठी बोलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या १२०० जणांना काल लगेचच ऑफर लेटर देण्यात आले.

        नौकरी महोत्सवाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी उपस्थित होतो याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मा.श्री.सुरेशरावजी वरपूडकर साहेब, मा.आ.विजयराव भांबळे साहेब, फौजिया खान मॅडम, मा.खा.सुरेशरावजी जाधव साहेब, भावनाताई नखाते, सोनालीताई देशमुख, जलालुद्दीन काजी, संतोषराव बोबडे यांच्यासह इतर मान्यवर तथा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...