CAA, NRC विरोधात प्रकाश आंबेडकरांची 'महाराष्ट्र बंद'ची हाक
'NRCच्या माध्यमातून 5 लाख आसाम मधून बेदखल केलेत ते कोणत्या देशातील आहेत याचा खुलासा भाजपने आधी करावा.'
CAA, NRC विरोधात प्रकाश आंबेडकरांची 'महाराष्ट्र बंद'ची हाक
मुंबई 17 जानेवारी : CAA, NRC विरोधात तापलेलं वातावरण कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ते म्हणाले, CAA, NRC मुळे देशात भयाच वातावरण आहे. 24 जानेवारीला अर्थव्यवस्थेबाबत केंद्र सरकरने 27 लाख कोटी देश चालवण्यासाठी आवश्यक असं बजेटमध्ये म्हटलं होतं. मात्र आतापर्यंत 11 लाख कोटी जमा झाले आहेत त्यामुळेच डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि CAA, NRC विरोधात 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यात विविध कामगार संघटना आणि मुस्लीम संघटना सहभागी होणार आहेत.
NRC मुळे काही मतदार दूर करायचे आहेत, सात नवरत्न विकायचे आहेत. शिवाजी महाराजांचं जे स्थान आहे ते आहे, काहीजण राजकारण करत आहेत, याबाबत आम्हाला राजकारण करायचं नाही. ते जनतेचे जाणता राजा आहेत, रयतेचे राजे आहेत. करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या मुद्यावर त्यांनी वर्तमानातले मुद्दे महत्वाचे, इतिहासात जात नाही असं मत व्यक्त केलं. NRCच्या माध्यमातून 5 लाख आसाम मधून बेदखल केलेत ते कोणत्या देशातील आहेत याचा खुलासा भाजपने आधी करावा असंही ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा