शुक्रवार, ८ मे, २०२०

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा
खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट
परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक व्यापारी अडचणी आले आहेत. अनेक रोजगार बंद पडण्याची वेळ आली आहे. परंतू आता जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेला एकही रुग्ण नाही. त्यामुळे सोमवार (दि.11) पासून जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथिलता देऊन हळू - हळू दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी खा.संजय जाधव व आ. डॉ.राहूल पाटील यांनी शुक्रवारी (दि.8) जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.
दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. वाहतुक व्यवस्था देखील बंद आहे. गेल्या दीड महिण्यापासूनची ही स्थिती आहे. राज्य शासनाने जिल्ह्याचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. यात ग्रीन, ऑरेंज व रेड हे तीन भाग असून परभणी जिल्हा हा सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. तो आता ग्रीन मध्ये जाईल. राज्यातील ऑरेंज व ग्रीन झोन मध्ये असणार्‍या काही जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे.  तेथील व्यवहार काही अंशी सुरु झाले आहेत. परिणामी रोजगार पुन्हा सुरु झाल्याने त्या जिल्ह्यातील आर्थिक चक्र फिरण्यास सुरुवात झाली आहे.
परभणी जिल्हा हा देखील ऑरेंज झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यात ही लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनानी केली होती. या संदर्भात काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी खा.जाधव व आ.पाटील यांची भेट घेवून अडचण व्यक्त केली होती. या संदर्भात खा.जाधव व आ.डॉ.पाटील या दोघांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. त्यांना लॉकडाऊनमध्ये आपल्या जिल्ह्याला शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकार्‍यांनी देखील यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्‍वासन दोन्ही लोकप्रतिनिधींना दिले. त्यामुळे येत्या सोमवारी(दि.11) पासून जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

व्यापार्‍यांनी काळजी घेतली पाहिजे- खा. संजय जाधव
लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळावी अशी आम्ही जिल्हाधिकार्‍यांना विनंती केली आहे. त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. परंतू लॉकडाऊन उठल्यानंतर व्यापार्‍यांनी स्वताची काळजी घेतली पाहिजे. सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन केले पाहिजे. व्यापार्‍यांनी दुकानात जास्त गर्दी होणार नाही याची काळजी स्वताच घ्यावी लागेल, असे  खा. संजय जाधव म्हणाले.

लोकांनी ही गर्दी करू नये- आ.डॉ.राहूल पाटील
लॉकडाऊन उठले म्हणजे कोरोनाचा संसर्ग संपला असे होत नाही. ही लढाई अजूनही चालणार आहे. त्यामुळे जिल्हयात लॉकडाऊनला शिथिलता मिळाली तरी लोकांनी बाजारात विनाकारण गर्दी करून नये. स्वताचे नियम स्वता पाळावे लागतील. तरच या संसर्गापासून आपला जिल्हा वाचेल, असे आ.डॉ.राहूल पाटील म्हणाले.

आरोग्य सेतू मोबाईलसह आता दूरध्वनीवर उपलब्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना नोंदणीचे आवाहन

*आरोग्य सेतू मोबाईलसह आता दूरध्वनीवर उपलब्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना नोंदणीचे आवाहन*

        परभणी, दि.7 :- आरोग्य सेतू मोबाईल अॅपचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने वापर करावा. जर स्मार्ट फोन नसेल तर साध्या मोबाईलने  किंवा दूरध्वनीवरून मोठ्या संख्येने १९२१ या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून  आरोग्य सेतू आयव्हीआरएस सिस्टीममध्ये नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म. मुगळीकर यांनी  केले आहे.
          स्मार्ट फोन धारकांव्यतिरीक्त भारतातील सर्व नागरिकांना साध्या मोबाईलने किंवा दूरध्वनी असलेल्या नागरिकांना आरोग्य सेतूशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवा सुरू केली आहे. ही सेवा देशभरात उपलब्ध आहे. ही एक टोल - फ्री सेवा आहे , जिथे नागरिकांना १९२१ क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावयाचा आहे . आपण १९२१ क्रमांकावर कॉल केल्यानंतर हा कॉल डीसकनेक्ट होईल आणि आपल्या फोनवर आरोग्य मंत्रालयाकडून फोन येईल आणि आपल्या आरोग्यासंदर्भात काही सोपे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची दिलेल्या उत्तरानुसार आरोग्य सेतू अॅपमधील सेल्फ अॅसेसमेन्ट ( स्वयं चाचणी ) प्रमाणे संरेखित केले जाईल. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे , नागरिकांना त्यांच्या आरोग्यासबंधी स्थिती दर्शविणारा एसएमएस देखील मिळणार आहे.  ही सुविधा मराठीसह इतर १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच्या सूचना आणि सतर्कतेचे संदेश नागरिकांना नियमीत पाठविण्यात येतील. 
          स्मार्ट मोबाईल फोन धारकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेले आरोग्य सेतू मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. अॅपद्वारे नोंदणी करून नागरिक स्वयं चाचणी करू शकतात तसेच या माहितीच्या आधारे नागरिकांना कोरोनाचा धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते . तसेच तुम्ही जर एखाद्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या जवळून गेल्यास किंवा त्याच्या संपर्कात आल्यास हे अॅप याबाबत सुचित करत असते. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                -*-*-*-*-

पाथरी येथे कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शांतीदुत तथागत गौत्तम बुध्द यांची जयंती घरोघरीच साजरी

पाथरी येथे कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शांतीदुत तथागत गौत्तम बुध्द यांची जयंती घरोघरीच साजरी

पाथरी(प्रतीनिधी)पाथरी येथे कोरोणा या संसर्गजन्ये आजाराच्या पार्श्वभुमीवर जगाला शांतीचा संदेश देनारे महाकारुणीक तथागत भगवान गौत्तम बुध्द यांच्या जयंती च्या निमीताने आयोजीत करण्यात आलेले सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करुन बौध्द बांधवांनी आपल्या घरीच बौध्द जयंती साजरी केली आसुन प्रशासनाच्या वतीने पोलीस निरिक्षक बोधगिरे यांनी केले वंदन
सविस्थर वृत आसे कि जगावर कोरोणा या संसर्गजन्ये आजाराने थैमान घातला आहे हजारो नागरीक या मध्ये मृत्युपावत आहेत 
याची खबरदारी म्हणुन आपल्या देशा मध्ये संचार बंदी व टाळे बंदी आदेश लागु आहेत या आदेशाचा आदर करुन पाथरी येथील महाकारुणीक तथागत भगवान गौत्तम बुध्द यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दि.७/५/२०२० रोजी आयोजीत करण्यात आलेले सर्वसार्वजनीक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते केवळ प्रशासनाच्या वतीने शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व शांतीदुत तथागत भगवान गौत्तम बुध्द यांच्या प्रतीमेला पोलीस निरिक्षक बोधगिरे व भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके यांच्या हास्ते पुष्पहार आर्पन करुन वंदन करण्यात आले या वेळी प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,भारिप नेते शामराव ढवळे,पञकार राजकुमार गायकवाड,पञकार आवडाजी ढवळे,न.प.स.सतीष वाकडे,गणेश घोगरे,समाधान अवसरमल,पो.पा.ठेंगे आदी उपस्थीत होते तर प्रशासनाच्या सुचनेचा आदर ठेवुन बौध्द जयंतीचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सर्व सार्वजनीक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभुमीवर प्रतेक बौध्द बांधवांनी आपआपल्या घरीच बौध्द वंदना घेवुन तथागत भगवान गौत्तम बुध्द जयंती साजरी केली आसुन पाथरी प्रशासनाच्या वतीने सर्व नागरीकास बुंध्द जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे

सोमवार, ४ मे, २०२०

पाथरीत आ.दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीस प्रारंभ,प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव.

पाथरीत आ.दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीस प्रारंभ,प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव.

पाथरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयोजनात व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महा संघ मर्या. यांच्यावतीने पाथरी येथे नितीन जिनिंग मध्ये ४ मे रोजी कापूस खरेदी चा शुभारंभ आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव मिळाला आहे.
               या प्रसंगी कृऊबास चे सभापती अनिल नखाते ,संचालक बाळासाहेब कोल्हे, नारायणराव आढाव, ग्रेडर एम.जी. पुरणकर, सहकार अधिकारी पी.बी. राठोड, नगरसेवक गोविंद हारकळ, पंचायत समिती सदस्य अजय थोरे, संदीप टेंगसे, कुणाल लहाने, गोपाल आग्रवाल, संतोष झंवर यांची उपस्थिती होती.
               लाँकडाऊन च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासुन कापुस खरेदी बंद झाल्याने शेतकरी हतबल झाला होता.परंतू शासनाने कापुस खरेदीच्या निर्बंधा बाबत शिथीलता देत कापुस खरेदीस परवानगी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील नोंदणी केलेल्या ४ हजार ३३० शेतकऱ्यांच्या कापुस खरेदीचे नियोजन केले आहे.नियोजनानुसार सोशल डिस्टन्सींग मध्ये ४ मे रोजी शहरातील नितीन जिनींग येथे २५ शेतकऱ्यांनी वाहनाद्वारे कापुस विक्रीसाठी आणला होता.आ.बाबाजानी दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे.यावेळी कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ३५५ असा भाव देण्यात आला अशी माहीती यावेळी देण्यात आली आहे.

शुक्रवार, १ मे, २०२०

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे ला निवडणूक.

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे ला निवडणूक.
May 1, 2020 • Narendra Kasabe

 

मुंबई –: महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीची आज घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा २७ मेपूर्वी आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. 

विधानपरिषदेचे २४ एप्रिलला ८ सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा २४ एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ९ जागांवर निवडणूक होणार आहे. लवकरच या निवडणुकीची अधिसूचना निघून पूर्ण कार्यक्रमाचा घोषित होणार आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता

.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा किंवा विधान परिषद या दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. मात्र विधानपरिषदेची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यामुळे घटनात्मक पेच निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानसभेवर घेण्याबाबत मंत्रिमंडळाने ठराव करून दोनवेळा राज्यपालांना पाठविला होता, मात्र तो प्रस्ताव राज्यपाल मान्य करत नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

अखेर त्यावर तोडगा काढण्यात यश मिळाले आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी देण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यानंतर पुढील हालचाली झाल्या.

विधानसभेत २८८ आमदार आहेत. विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून जायला २९ मतांचा कोटा आहे. आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपच्या तीन जागा जवळपास निश्चित आहेत. नवव्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे १७० मते आहेत.

सहा जागांसाठी त्यांना १७४ मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे १०५ स्वत:ची तर ६ ते ७ मित्रपक्षांची मते असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीला ५ आणि भाजपला ३ जागा निश्चित मानल्या जात आहेत. नववी जागा कुणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.विधानसभेतील बहुमत चाचणीच्या वेळी महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १६९ मते मिळाली होती. मात्र विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे.

महाविकासआघाडीने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक नक्कीच रंगतदार होईल. पण मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असताना हा धोका आघाडी पत्करण्याची शक्यता नाही व निवडणूक बिनविरोध करण्याकडेच सत्तारूढ आघाडीचा प्रयत्न राहील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न

*महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री श्री. नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न*

  परभणी दि.1 :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी 'महाराष्ट्र दिन' हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन समारंभानिमित्त शुक्रवार दि. 1 मे , 2020 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सकाळी 8 वाजता  आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री  श्री.नवाब मलिक यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले.
         
 यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपस्थित होते.
                        -*-*-*-*-

सेलूच्या त्या महिलेने नांदेडला प्राण सोडला; जिल्हा प्रशासन पुढील कारवाई करणार!!


परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका महिलेला नांदेडच्या रुग्णालयात दाखल केले होते .....तिला संसर्गजन्य आजार झाल्याचेही अहवालात म्हटले होते......... तसेच तिला कॅन्सर काही आजार होता असेही वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले की ही महिला कॅन्सर आजाराने ग्रासली होती......
नांदेड येथील जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत.गुरुवारी रात्री उशिरा तिचे निधन झाल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे ......... गुरुवारी रात्री उशिरा या निधनाचे वृत्त आले आहे.‌...नांदेड जिल्हा परिषद सणाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले की गुरुवारी रात्रीच्या सुमारास या महिलेचे निधन झाले आहे उपचाराच्या दरम्यान तिने प्राण सोडला आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सर्व योजना केल्या आहेत

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पुढील कारवाई जिल्हा प्रशासन करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने उशिरा सांगितले 


यासंदर्भात अधिक माहिती अशी की परभणी जिल्ह्यातील एक महिला अत्यंत आजारी असल्यामुळे औरंगाबाद येथे गेली होती सेलू येथे वास्तव्याला असलेली ही महिला औरंगाबाद येथील उपचारादरम्यान सेलू येथे आली होती आणि सेलू वरून परभणी मार्गे नांदेड येथे गेली होती नांदेड येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे


सेलूतील त्या कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू

नांदेडच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान करोना पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या सेलूतील त्या महिलेचा गुरवारी राञी नांदेड येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.चार महिन्यांपूर्वीच ती महिला औरंगाबादमध्येच एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाली होती. 27 एप्रिल रोजी  सेलूस आल्यानंतर त्या महिलेस अस्वस्थ वाटल्याने कुटूंबियांनी महिलेस 28एप्रिल रोजी परभणीत आणल्यानंतर मोंढा भागातील एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल केले.तेथून त्या महिलेस नांदेडला नेण्यात आले.त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले,तेव्हा ती महिला करोना पाॅझिटिव्ह आढळून आली.  
दरम्यान नांदेड आरोग्य विभागाने त्या महिलेच्या सोबतच्या दोन मुलांना लगेच क्वाॅरंटांईन केले आहे.नांदेड जिल्हा प्रसासनाने  कळवल्यानंतर सेलूतील कुटूंबातील आठ व अन्य तविस जणांनाही क्वाॅरंटाईन करण्यात आले त्याचेही स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी औरंगाबादमध्ये पाठवण्यात आले आहेत

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...