पाथरीत आ.दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीस प्रारंभ,प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव.
पाथरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयोजनात व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महा संघ मर्या. यांच्यावतीने पाथरी येथे नितीन जिनिंग मध्ये ४ मे रोजी कापूस खरेदी चा शुभारंभ आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव मिळाला आहे.
या प्रसंगी कृऊबास चे सभापती अनिल नखाते ,संचालक बाळासाहेब कोल्हे, नारायणराव आढाव, ग्रेडर एम.जी. पुरणकर, सहकार अधिकारी पी.बी. राठोड, नगरसेवक गोविंद हारकळ, पंचायत समिती सदस्य अजय थोरे, संदीप टेंगसे, कुणाल लहाने, गोपाल आग्रवाल, संतोष झंवर यांची उपस्थिती होती.
लाँकडाऊन च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च पासुन कापुस खरेदी बंद झाल्याने शेतकरी हतबल झाला होता.परंतू शासनाने कापुस खरेदीच्या निर्बंधा बाबत शिथीलता देत कापुस खरेदीस परवानगी दिली.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील नोंदणी केलेल्या ४ हजार ३३० शेतकऱ्यांच्या कापुस खरेदीचे नियोजन केले आहे.नियोजनानुसार सोशल डिस्टन्सींग मध्ये ४ मे रोजी शहरातील नितीन जिनींग येथे २५ शेतकऱ्यांनी वाहनाद्वारे कापुस विक्रीसाठी आणला होता.आ.बाबाजानी दुर्राणी यांचे हस्ते कापुस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे.यावेळी कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ३५५ असा भाव देण्यात आला अशी माहीती यावेळी देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा