शुक्रवार, ८ मे, २०२०

आरोग्य सेतू मोबाईलसह आता दूरध्वनीवर उपलब्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना नोंदणीचे आवाहन

*आरोग्य सेतू मोबाईलसह आता दूरध्वनीवर उपलब्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना नोंदणीचे आवाहन*

        परभणी, दि.7 :- आरोग्य सेतू मोबाईल अॅपचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने वापर करावा. जर स्मार्ट फोन नसेल तर साध्या मोबाईलने  किंवा दूरध्वनीवरून मोठ्या संख्येने १९२१ या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून  आरोग्य सेतू आयव्हीआरएस सिस्टीममध्ये नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दी.म. मुगळीकर यांनी  केले आहे.
          स्मार्ट फोन धारकांव्यतिरीक्त भारतातील सर्व नागरिकांना साध्या मोबाईलने किंवा दूरध्वनी असलेल्या नागरिकांना आरोग्य सेतूशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवा सुरू केली आहे. ही सेवा देशभरात उपलब्ध आहे. ही एक टोल - फ्री सेवा आहे , जिथे नागरिकांना १९२१ क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावयाचा आहे . आपण १९२१ क्रमांकावर कॉल केल्यानंतर हा कॉल डीसकनेक्ट होईल आणि आपल्या फोनवर आरोग्य मंत्रालयाकडून फोन येईल आणि आपल्या आरोग्यासंदर्भात काही सोपे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची दिलेल्या उत्तरानुसार आरोग्य सेतू अॅपमधील सेल्फ अॅसेसमेन्ट ( स्वयं चाचणी ) प्रमाणे संरेखित केले जाईल. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे , नागरिकांना त्यांच्या आरोग्यासबंधी स्थिती दर्शविणारा एसएमएस देखील मिळणार आहे.  ही सुविधा मराठीसह इतर १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच्या सूचना आणि सतर्कतेचे संदेश नागरिकांना नियमीत पाठविण्यात येतील. 
          स्मार्ट मोबाईल फोन धारकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेले आरोग्य सेतू मोबाईल अॅप उपलब्ध करुन दिले आहे. अॅपद्वारे नोंदणी करून नागरिक स्वयं चाचणी करू शकतात तसेच या माहितीच्या आधारे नागरिकांना कोरोनाचा धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते . तसेच तुम्ही जर एखाद्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या जवळून गेल्यास किंवा त्याच्या संपर्कात आल्यास हे अॅप याबाबत सुचित करत असते. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
                -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...