बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

आेंकार सेवाभावी संस्थेच्या वतिने आयोजित नेत्र रोग तपासनी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा -डाँ जगदीश शिंदे

पाथरी येथील समाजसेवक तथा डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या ओंकार सेवाभावी संस्थेच्यावतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
पाथरीतील ओंकार हॉस्पिटल मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू व्यक्तींना याचा लाभ देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.....
मोफत नेत्र तपासणी आणि शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी करून त्यावर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर जगदीश शिंदे यांनी दिली आहे
दरम्यान तारखेपासून मोफत शस्त्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे......
पाथरी आणि परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा सहभाग घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे......


बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

जेष्ठांचा कुटुंबातला आणी सामाजिक सामाजिक सहभाग महत्वाचा-जगदीश शिंदे

*ज्येष्ठांचा कुटुंबातला आणि सामाजिक सहभाग महत्वाचा - डॉ.जगदीश शिंदे*

   पाथरी/प्रतिनिधी
वेळ कोणासाठीच थांबत नसतो परंतु जीवनाच्या या प्रवासात असंख्य माणसे आपल्याला भेटतात आणि त्यापैकी काहींसोबत एक माणुसकीच अतूट नातं तयार होत.अशाच माणुसकीच्या एका अतूट नात्याचे दर्शन करवून देणारा आणि आजच्या काळातही नात्या-नात्यातील मायेचा ओलावा जपणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.जगदीश शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाथरीकरांना पहावयास मिळाले.
  नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत याही वर्षी ओंकार वृद्धाश्रम,पाथरी तर्फे,दि.१२ सप्टेंबर,बुधवार रोजी जागतिक वयवृद्ध दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पाथरीच्या तहसीलदार श्रीमती नीलम बाफना,उपजिल्हाधिकारी श्री.व्ही.एल.कोळी डॉ.प्रशांत सासवडे,डॉ.निवृत्ती पवार,डॉ.महेश कोल्हे,युवानेते संदीपभैया टेंगसे,तुकाराम पौळ इत्यादी तसेच समाजातील प्रतिष्टीत मंडळीची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.जगदीश शिंदे यांनी ओंकार वृद्धाश्रमाच्या सुरवातीपासून आजपर्यंतच्या प्रवासावर थोडक्यात प्रकाश टाकला तसेच ज्येष्ठांचा कुटुंबातला आणि सामाजिक सहभाग वाढवणे हि आजची गरज असून उद्या आपणही म्हातारे होणार आहोत याची जाणीव ठेवून मागच्या पिढीशी संवाद ठेवला तर त्यांच्या ज्ञानाचा,अनुभवाचा भरपूर फायदा पुढच्या पिढय़ांना होऊ शकतो.असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.
    त्याचबरोबर ओंकार वृद्धाश्रमाच्या संदर्भात असलेल्या अडचणी आलेल्या मान्यवरांसमोर ठेवल्या.या अडचणींना प्रतिसाद देत पाथरीच्या तहसीलदार श्रीमती नीलम बाफना तसेच उपजिल्हाधिकारी श्री.व्ही.एल.कोळी यांनी लवकरातलवकर शासकीय स्तरावर अडचणींचा पाठपुरावा करून त्या सोडवण्याचे आश्वासन उपस्थिताना दिले.या सोबतच दोन्ही मान्यवरांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत मनमोकळेपणाने गप्पाहि मारल्या आणि वृद्धांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाची शिदोरी विश्वासाने त्यांच्यासमोर मांडली तसेच मान्यवरांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धाना जागतिक वय वृद्ध दिनानिमित्य शुभेच्छाहि दिल्या.
   आयुष्याच्या या टप्प्यावर आपण एकटे नाहीत, तर कुणीतरी आपल्या सोबत आहे ही भावना यावेळी या वृद्ध चेहऱ्यांचा मनात घर करून गेली असेल हे मात्र नक्की.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापूराव कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.निवृत्ती पवार यांनी केले.


शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

ऊँकार व्रध्दाश्रम पाथरी येथे जागतिक वयोवृद्ध दीन कार्यक्रमास उपस्थित रहावे-डाँ.जगदीश शिंदे

ऊँकांर व्रध्दाश्रम पाथरी येथे दी ११ सप्टेबंर मंगळवार रोजी दत्तनगर बसस्टँड पाठीमागे हाँटेल सिटी प्राईड जवळ ऊँकार हास्पिटल येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक वयोवृद्ध दीन साजरा करण्यात येणार असल्याची माहीती ऊँकार व्रध्दाश्रमचे संचालक डाँ.जगदीश शिंदे यांनी एका प्रशिध्दी पत्रकाद्वारे दीली आहे त्याच बरोबर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अव्हाहन देखील डाँ.जगदीश शिंदे यांनी केले आहे.
      या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हाधिकारी पि.शिवाशंकर हे राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिति म्हणुनि उपजिल्हाधिकारी व्ही.एल.कोळी ,तहसिलदार निलम बाभणा ,आर.एल.सलगर-कार्यकारी अभियंता पाठबंदारे विभाग-२ परभणी,सुनिल भोकरे-उपमुख्य कार्यकारी अधिकारी बीड हे उपस्थित  राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला  मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अव्हाहन डाँ.जगदीश शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे


मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा

पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा..

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलसह घरगुती वापराच्या इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. आपल्या परभणी जिल्ह्यात पेट्रोलने उच्चांक गाठला असून देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत आहे. यामुळे सर्व नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.  केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आज माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी शहरातून सायकल मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी भवनापासून निघालेला मोर्चा वसमत रोडने काळी कमान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले सरकार विरोधी फलक घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने मा.जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करत मोर्चाचा समारोप करण्यात आला.

देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने इंधन दरवाढ केल्याने जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी असताना सरकार दररोज दर वाढवित असून, जीवनावश्यक वस्तुंच्या भावातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीत सरकारने किंमती कमी करण्याचा त्वरीत निर्णय घ्यावा व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी आ.विजयराव भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मा.जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, जि.प उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते, ज्येष्ठ नेते बापूराव घाटोळ, मनपा गटनेते जलालोद्दीन काजी, जि.प गटनेते अजयराव चौधरी, प्रा.किरण सोनटक्के, शांतिस्वरूप जाधव, सुमंत वाघ, सय्यद इम्रान, किरण तळेकर, डॉ.खिल्लारे, प्रा.सुरेंद्र रोडगे, मोहम्मद गौस, मनोज राऊत, संतोष देशमुख, वसंतराव सिरस्कर, संदीप माटेगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.


लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...