मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१८

पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा

पेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा..

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलसह घरगुती वापराच्या इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. आपल्या परभणी जिल्ह्यात पेट्रोलने उच्चांक गाठला असून देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत आहे. यामुळे सर्व नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.  केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आज माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी शहरातून सायकल मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी भवनापासून निघालेला मोर्चा वसमत रोडने काळी कमान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले सरकार विरोधी फलक घेतले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने मा.जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करत मोर्चाचा समारोप करण्यात आला.

देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने इंधन दरवाढ केल्याने जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी असताना सरकार दररोज दर वाढवित असून, जीवनावश्यक वस्तुंच्या भावातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीत सरकारने किंमती कमी करण्याचा त्वरीत निर्णय घ्यावा व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी आ.विजयराव भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, मा.जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, जि.प उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते, ज्येष्ठ नेते बापूराव घाटोळ, मनपा गटनेते जलालोद्दीन काजी, जि.प गटनेते अजयराव चौधरी, प्रा.किरण सोनटक्के, शांतिस्वरूप जाधव, सुमंत वाघ, सय्यद इम्रान, किरण तळेकर, डॉ.खिल्लारे, प्रा.सुरेंद्र रोडगे, मोहम्मद गौस, मनोज राऊत, संतोष देशमुख, वसंतराव सिरस्कर, संदीप माटेगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...