*ज्येष्ठांचा कुटुंबातला आणि सामाजिक सहभाग महत्वाचा - डॉ.जगदीश शिंदे*
पाथरी/प्रतिनिधी
वेळ कोणासाठीच थांबत नसतो परंतु जीवनाच्या या प्रवासात असंख्य माणसे आपल्याला भेटतात आणि त्यापैकी काहींसोबत एक माणुसकीच अतूट नातं तयार होत.अशाच माणुसकीच्या एका अतूट नात्याचे दर्शन करवून देणारा आणि आजच्या काळातही नात्या-नात्यातील मायेचा ओलावा जपणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन डॉ.जगदीश शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाथरीकरांना पहावयास मिळाले.
नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासत याही वर्षी ओंकार वृद्धाश्रम,पाथरी तर्फे,दि.१२ सप्टेंबर,बुधवार रोजी जागतिक वयवृद्ध दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पाथरीच्या तहसीलदार श्रीमती नीलम बाफना,उपजिल्हाधिकारी श्री.व्ही.एल.कोळी डॉ.प्रशांत सासवडे,डॉ.निवृत्ती पवार,डॉ.महेश कोल्हे,युवानेते संदीपभैया टेंगसे,तुकाराम पौळ इत्यादी तसेच समाजातील प्रतिष्टीत मंडळीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ.जगदीश शिंदे यांनी ओंकार वृद्धाश्रमाच्या सुरवातीपासून आजपर्यंतच्या प्रवासावर थोडक्यात प्रकाश टाकला तसेच ज्येष्ठांचा कुटुंबातला आणि सामाजिक सहभाग वाढवणे हि आजची गरज असून उद्या आपणही म्हातारे होणार आहोत याची जाणीव ठेवून मागच्या पिढीशी संवाद ठेवला तर त्यांच्या ज्ञानाचा,अनुभवाचा भरपूर फायदा पुढच्या पिढय़ांना होऊ शकतो.असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले.
त्याचबरोबर ओंकार वृद्धाश्रमाच्या संदर्भात असलेल्या अडचणी आलेल्या मान्यवरांसमोर ठेवल्या.या अडचणींना प्रतिसाद देत पाथरीच्या तहसीलदार श्रीमती नीलम बाफना तसेच उपजिल्हाधिकारी श्री.व्ही.एल.कोळी यांनी लवकरातलवकर शासकीय स्तरावर अडचणींचा पाठपुरावा करून त्या सोडवण्याचे आश्वासन उपस्थिताना दिले.या सोबतच दोन्ही मान्यवरांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत मनमोकळेपणाने गप्पाहि मारल्या आणि वृद्धांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यातील सुखदुःखाची शिदोरी विश्वासाने त्यांच्यासमोर मांडली तसेच मान्यवरांनी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धाना जागतिक वय वृद्ध दिनानिमित्य शुभेच्छाहि दिल्या.
आयुष्याच्या या टप्प्यावर आपण एकटे नाहीत, तर कुणीतरी आपल्या सोबत आहे ही भावना यावेळी या वृद्ध चेहऱ्यांचा मनात घर करून गेली असेल हे मात्र नक्की.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बापूराव कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.निवृत्ती पवार यांनी केले.
बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
जेष्ठांचा कुटुंबातला आणी सामाजिक सामाजिक सहभाग महत्वाचा-जगदीश शिंदे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा