गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

भिमप्रेमी बांधवांची साथ राहिली तर याही पेक्षा मोठी कामगिरी करेल- आ.राहुल पाटील.

भिमप्रेमी बांधवांची साथ राहिली तर याही पेक्षा मोठी कामगिरी करेल- आ.राहुल पाटील.

सुप्रसिद्ध सिनेगायक वैशाली माडे, अभिजित कोसंबी, आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांचा भीमगीतांचा मुकाबला व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी हजारो माता-भगिनी व तरुणांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा बांधण्यात यावा अशी माझी खूप इच्छा होती. तो पुतळा माझ्याच कारकिर्दीत व प्रयत्नातून झाला याचा मला अभिमान आहे. पार्लमेंट नंतर बाबासाहेबांचा असा पुतळा साधारणपणे कुठेही बघायला मिळणार नाही ही माझ्यासहित सर्व परभणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे लोकार्पण माझ्या हस्ते काल करण्यात आले. त्याच बरोबर भीमनगर येथे २ कोटी ३० लक्ष रुपयांच्या खर्चातुन जिल्ह्यातील एकमेव बहूउद्देशीय सभागृह 'सद्भावना भवन'चे भूमिपूजन देखील करण्यात आले. यानिमित्ताने भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

परभणीमध्ये विपश्यना केंद्र व्हावे यासाठी आमचे मित्र सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ५ कोटीच्या निधीची मागणी कार्यक्रमात केली होती. मी सर्व भीमसैनिकांना सांगू इच्छितो, तुम्ही मला दिलेली साथ जर अशीच कायम राहिली तर शासन दरबारी भांडून ५ काय १० कोटी निधी खेचून आणेन. भीमसैनिकांनी नेहमी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आलोय व यापुढेही करत राहील. ३५ लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा पुतळा पूर्ण परभणीची शोभा वाढवेल यात काही शंका नाही. भिमप्रेमी बांधवांची साथ राहिली तर पुढील काळात याही पेक्षा मोठी कामगिरी करेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...