मानवत येथे ब्राम्हण समाज सभा मंडपाचे भुमीपुजन
मानवत दि.१०(सा.वा.)येथील ब्राम्हण समाजाच्या सभा मंडपाचे भुमी पुजनाचा कार्यक्रम आमदार मोहन फड यांच्या हस्ते मंगळवार दि.१० रोजी जुने दत्त मंदीर मध्ये बृम्ह वृंद यांनी शांती पाठ चे पठण करुन पार पडला.
यावेळी आमदार मोहन फड,युवा नेते डाॅ.अंकुश लाड,नगराध्यक्ष प्रा.सखाहारी पाटील,अॅड.अजय कुलकर्णी,अॅड किरण दैठणकर,नगर सेवक गणेश कुमावत,मोहन लाड,गिरीश कञुवार,गणेश कुर्हाडे,दत्ता चौधरी,पाथरी पञकार संघ अध्यक्ष माणीक केंद्रे,बापु जाधव,नारायण भिसे,सावंगी सरपंच विकास मगर,इरळद सरपंच अशोक कचरे,आदीची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार मोहन फड,नगराध्यक्ष प्रा.सखाहारी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शहरात ब्राम्हण समाज हा मोठ्या प्रमाणात असुन समाजाची बर्याच वर्षापासुन सभा मंडपाची मागणी युवा नेते डाॅ.अंकुश लाड यांच्या कडे केली होती .यासाठी डाॅ.अंकुश लाड यांनी विशेष प्रयत्न करुन आमदार मोहन फड यांच्या आमदार निधीतुन ५० लक्ष रु.चा निधी सभा मंडपासाठी मंजुर करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड अनिरुध्द पांडे यांनी केले.सुञसंचलन कल्याण वसेकर तर आभार प्रर्दशन गोविंद जोशी यांनी केले.कार्यक्रमास शहरातील समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा