रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा येथिल शेतकर्याची आत्महत्या

पाथरी-परभणी) – सततची नापीकी बॅंकेच्या कर्जाचा वाढता डोंगर त्यात मुलीचे लग्न कसे करणार घरचा उदरनिर्वाह कसा चालवायचा सतत याच विवंचनेत असणाऱ्या 42 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषधी प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवार २६ ऑगष्ठ रोजी पाथरी तालूक्यातील लोणी सुरताबाई तांडा येथे घडली असून या प्रकरणी पाथरी पोलिसात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रां कडून मिळालेल्या माहिती नूसार पाथरी तालूक्यातील लोणी ( बु ) अंतर्गत येणाऱ्या सुरताबाई तांडा येथील ४२ वर्षीय शेतकरी विष्णू हरीभाऊ राठोड यांची लोणी शिवारात ६० आर शेती असून पत्नी, दोन मुल आणि एक मुलगी असा परीवार असून मागील काही वर्षा पासुन सततची नापीकी त्यात बँकेचे घेतले कर्जाचा वाढत चाललेला डोंगर यामुळे घर चालवने दिवसें दिवस कठीण होत चालल्याने पैशा अभावी मोठ्या मुलाला बारावी पासुन शिक्षण सोडण्याची वेळ आली. तर मुलगी लग्नाला आल्याने लग्नाचा मोठा खर्च कूठून करायचा सतत याच विवंचनेत असणाऱ्या विष्णू राठोड या शेतकऱ्याने रविवार २६ ऑगष्ठ दिवशी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणी आशामती विष्णू राठोड यांच्या खबरे वरून पाथरी पोलीसात १७४ सीआरपीसी नुसार आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...