बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी केला अग्निशामक दलाच्या गाडीतील पाण्याचा वापर

स्वच्छतागृह स्वच्छतेसाठी केला अग्निशामक दलाच्या गाडीतील पाण्याचा वापर

आय टी आय मधील स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी अग्निशामक दलाचे पाणी वापरण्यासाठी पाणी घेत असता पाण्याचा वाॅल लीक झाल्यामुळे जे पासेस देण्यासाठी तहसील चे कर्मचारी टेबल घेऊन बसले होते ती सर्व पासेस व रेकॉर्ड पाण्याने भिजली आहेत तसेच महीला कर्मचारी पण यात भिजल्या याची माहीती निवडणूक अधिकारी यांना आहे कि नाही याची कल्पना नाही. परंतु पत्रकारांना पासेस देण्याचा अधिकार त्यांना नाही म्हणतायत.

भिजलेली कोरी पासेस व संपूर्ण भिजलेला रेकॉर्ड यांची दुरूस्ती कशी करणार याचे स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी यांनी द्यावे. तसेच हे पाणी जर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी वापराल तर अचानक आग वगैरे लागल्यास कोठून मागवणार पाणी असा सवालही उपस्थित केला जात आहे.


रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

पाथरी शहरासह ग्रामीण भागात पैशाचा पाऊस...! अनेक ठिकाणी दिवसभर मतदारांवर पैशाचा पाऊस पडला..

पाथरी शहरासह ग्रामीण भागात पैशाचा पाऊस...! अनेक ठिकाणी दिवसभर मतदारांवर पैशाचा पाऊस पडला..

पाथरी:पाथरी विधानसभा निवडणुकीत मतदार, कार्यकर्ते आणि नेत्यांचा दर वधारला आहे. मतदारांप्रमाणे कार्यकर्त्यांना ५ हजार ते २० हजार रुपये गेल्या आठवडय़ांपूर्वीच घरपोच केल्याचे कळते. ज्या नेत्यांमुळे शहरात कार्यकर्त्यांकरवी प्रचार कामे करून घ्यायची असतात अशांचा दर २५ हजार ते दीड लाख रुपयांवर गेल्याचे समजते. मात्र मते विकत घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने एक यंत्रणाच कामाला लावल्याचेही समजते. राजकीय पक्षांच्या यंत्रणेकडून मतदारांच्या घरपोच मतदार स्लिपांसोबत करकरीत नोट असलेले पाकीटही धाडले जात आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या या सणात पाथरी मतदाराला सुगीचे दिवस आले आहेत. 

पैसे वाटप करणाऱ्या विश्वासू कार्यकर्त्यांना ही मंडळी गराडा घालत आहेत. मात्र आपल्या भ्रष्ट व्यवहाराची शंका इतरांना येऊ नये यासाठी मतदानयादीत आपले नाव आहे का, याची चौकशी करण्यासाठी आल्याचे ही मंडळी भासवत आहेत. या सर्व प्रकारामुळे वाटणाऱ्यांचे हात थकतील मात्र घेणाऱ्यांचे मन भरणार नाही, याचा प्रत्यय विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आला आहे. विशेष म्हणजे या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना लक्ष्मीदर्शनाचा मोहाला सुरुवात केल्याने आता हेच नेतेमंडळी डोक्याला हात लावत आहेत. या मतविक्रीच्या कारभारामध्ये काही मतदारांनी दोन्हीही स्पर्धक उमेदवारांकडून मिळणारी मतांची किंमत खिशात घातल्याचे कळते. सध्या  मतांचा दर ५०० ते १ हजार रुपये आहे. ग्रामिणसह शहरातील अनेक ठिकाणी काल रात्री व आज दिवसभर मतदारांवर पैशाचा पाऊस पडला.

 तसेच मतदारयादीत नाव शोधणाऱ्यांची संख्या अचानक राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये वाढली आहे. नाव शोधल्यानंतर संबंधित मतदार खाली खिसा घेऊन परतण्याऐवजी शेजारी पैसे वाटप झाले, पण माझ्या घरातील नातेवाइकांच्या मतांची रक्कम मिळाली नाही याचा जाब लोकशाहीच्या या सणात हक्काने संबंधित कार्यालयातील प्रमुखाला विचारत आहेत. सर्वच मतदार असे नाहीत मात्र काही मतदार आपल्या मतांची हक्काने किंमत लावत असल्याचे कळते. त्यामुळे राजकीय पक्षांची कार्यालये मतदारराजाने फुलल्याचे दिसत आहेत.
 मतांची किंमत दिल्यानंतरही मतदारांने इतर राजकीय पक्षाच्या उमेदवाराला आपले विकलेले मते देऊ नये, याबांधीलकीसाठी संबंधित मतदाराचे नाव, त्याचा मतदार क्रमांकापुढे स्वाक्षरी घेण्याची नवीपद्धत काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अवलंबली आहे.काही पक्ष पैसे देऊन मत विकत घेत असल्याच्या तक्रारी येऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासन निष्क्रिय राहिल्यामुळे निवडणूक पैशाच्या बळावरच झाली असे खेदाने म्हणावे लागेल.

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सोनपेठ शहर सर्व शाखीय सोनार संघाच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड ,सोमेश्वर आंबेकर यांची अध्यक्ष तर अतूल दहिवाळ यांची सचिव पदी निवड

सोनपेठ शहर सर्व शाखीय सोनार संघाच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सोमेश्वर आंबेकर यांची अध्यक्ष तर अतूल दहिवाळ यांची सचिव पदी निवड


सोनपेठ (प्रतिनिधी)

येथील सर्वशाखीय सोनार समाज बांधवांची सर्वसाधारण सभा नुकतीच संतशिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली. 
   
यात सोमेश्वर आंबेकर यांची अध्यक्ष, किरण दहिवाळ यांची उपाध्यक्ष, अतूल दहिवाळ यांची सचिव, महेश खेडकर यांची सहसचिव पदी, सर्वश्री अनिल लोलगे, कन्हैय्यालाल वर्मा, मुंजाभाऊ दहिवाळ, संदिप टाक, ऋषिकेश खेडकर, मनोज दहिवाळ, संजय शहाणे, अमोल दहिवाळ, दिपक टाक, राहुल दहिवाळ, प्रविण कुलथे, मनोज राजूरकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली; तर समाजातील सर्व ज्येष्ठांवर संघटना बळकटीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यकरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. 
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मावळते अध्यक्ष किसनराव टाक हे होते. बैठकीची सुरूवात संतशिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. 
यावेळी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना सन्मानित करणे, समाज घटकांच्या व्यावसायिक अडीअडचणी वर मात करण्यासाठी सर्व ताकदीनिशी पाठपुरावा करणे, मंदिर विकासासाठी व संतशिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त आणि वेळोवेळी प्रसंगानुरूप राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर होणाऱ्या संभाव्य खर्चासाठी समाजबांधवांकडून निधी संकलन करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात येवून त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष सोमेश्वर आंबेकर यांनी यावेळी बोलतांना म्हणाले की, शहरातील सोनार समाजाच्या सर्वशाखीय समाज बांधवांना विश्वासात घेऊन समाज हित व मंदिर विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शेवटी नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सराफा असोसिएशनचे शहराध्यक्ष विष्णूपंत दहिवाळ, मार्तंड जोजारे, सुर्यकांत दहिवाळ, भारत दहिवाळ, वसंत खेडकर, किसन टाक, सुरेश टाक, राजेश्वर खेडकर, नंदकिशोर टाक, संतोष टाक, राजाभाऊ वेदपाठक, रामेश्वर टाक, नंदकुमार दहिवाळ, गणेश कुलथे, गोविंद पंडीत, वैजनाथ वेदपाठक, संजय पाटील आटणीवाले, ठंडी बंगाली आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन राजेश्वर खेडकर यांनी केले.

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

अरे हे काय पाथरी विधानसभा ना सेनेला ना भाजपाला ही जागा आठवले गटाल,आठवले गटाकडुन मोहन फड उमेदवारी अर्ज दाखल करणार

*अरे हे काय पाथरी विधानसभा ना सेनेला ना भाजपाला ही जागा आठवले गटाला*

*आठवले गटाकडुन मोहन फड उमेदवारी अर्ज दाखल करणार*

पाथरी:-विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषना केली आहे.
गेल्या तीन दीवसांपासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणी प्रदेशाध्यक्ष चंन्द्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असुन अंतिम निर्णय झाला आहे.भाजपा -शिवसेना महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या सहा जागा सोडण्यात आल्याची माहीती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणी केंन्द्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दीली आहे.परंतु मोठी गंमत म्हणजे पाथरी विधासभेची जागा मीळवण्यासाठी भाजपा-शिवसेना ईच्छुक उमेदवारांनी चढा-ओढ लावली होती परंतु ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली आहे .आणी ही पाथरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाकडुन मोहन फड हे लढवणार आहेत हे मात्र निश्चित झाले आहे तर उद्या दीनांक 3 आक्टोबर गुरवार रोजी समर्थकासह उमेदवारी दाखल करणार असल्याची माहीती मिळाली आहे.

बैलगाड्यांची भव्व रॅली काढत डॉ शिंदे करणार अपक्ष उमेदवारी दाखल

बैलगाड्यांची  भव्व रॅली काढत डॉ शिंदे करणार अपक्ष उमेदवारी दाखल

प्रतिनिधी
पाथरी:-शिवसेने कडून पाथरी विधानसभा मतदार संघात उमेवारी साठी अग्रभागी राहिलेले  मात्र युतीत  ही जागा मित्र पक्षाला गेल्याने  मागिल अनेक वर्षा पासून मतदार संघातील गोरगरीबां  साठी अहोरात्र समाज सेवा करणारा भुमीपूत्र डॉ जगदिश शिंदे हे आता जनतेच्या दरबारात  जाऊन न्याय मागणार असून पाथरी विधानसभा मतदार संघातून ते चार सप्टेबर शुक्रवार रोजी भव्य अशा बैलगाडी  रॅली व्दारे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा डॉ जगदिश शिंदे यांनी केली.
डॉ जगदिश शिंदे हे मागिल दहा वर्षा पासून पाथरी तालुक्यात आपल्या ओंकार हॉस्पिटलच्या  माध्यमातून सामाजिक कार्यात जोडले गेले आहेत.मागिल पाच वर्षा पुर्वी पासून निराधार वृद्धांना निशुल्क आधार देत त्यांचे पालन पोषण करत आज पर्यंत दोनशे वर वृद्धांची सेवा त्यांनी केली आहे.या सोबतो मतदार संघ आणि बाहेरच्या रुग्नांना ही विविध आजारां साठी आरोग्य शिबिरे घेत मोफत उपचार आणि शस्रक्रीया केल्या आहेत यात हजारो रुग्नांनी याचा फायदा घेतला आहे.तर हजारो बेरोजगारांना रोजगार मेळाव्या मधून रोजगार मिळऊन देत त्यांच्या आणि कुटूंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे.या सोबतच आत्महात्या ग्रस्त शेतकरी कुटूंबांना बियाणे मदत,पुरग्रस्तांना मदत शहिदांना मदत,विद्यार्थ्यां साठी करीअर मार्गदर्शन शिबिरे असे एकना अनेक  उपक्रम राबत असतांना लोकसभा निवडणुकी वेळी परभणी येथील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेत प्रवेश करून पाथरी विधानसभा मतदार संघाची निवडणुक लढऊन राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचा निर्णय घेतला मात्र युतीत ही जागा विद्यमान आ मोहन फड यांना गेल्याने डॉ जगदिश शिंदे हे आता अभिनही तो कभी नही म्हणत विधानसभेच्या रणसंग्रामात उतरणार असून आपल्या साथीदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैलगाड्यांची रॅली काढून हा शेतकरी पुत्र असलेला समाजसेवक डॉक्टर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार लढणार आणि जिंकणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

शिवसेने’ची 70 जागांसाठी उमेदवारांची पहिली ‘यादी’ जाहीर, ‘हे’ आहेत ‘तुमच्या’ मतदातसंघातील ‘उमेदवार’

शिवसेने’ची 70 जागांसाठी उमेदवारांची पहिली ‘यादी’ जाहीर, ‘हे’ आहेत ‘तुमच्या’ मतदातसंघातील ‘उमेदवार’

मुंबई : – भाजपने आपली पहिली यादी घोषित केल्यानंतर शिवसेनेने देखील आपली पहिलीयादी घोषित केली आहे. या यादीत 70 जागांची घोषणा करण्यात आली. युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने आपली 125 उमेवारांची घोषणा केली आहे.

शिवसेनेच्या यादीत अपेक्षे प्रमाणे आदित्य ठाकरे, प्रदिप शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, मुंबादेवी मधून पांडूरंग सपकाळ, रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्व मधून, जालन्यातून अर्जुन खोतकर, नाला सोपाऱ्यातून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून लढणार आहेत.

वैभव नाईक यांना कुडाळ मधून तर, प्रतापराव सरनाईक ओवळा माजीवाड येथून, जयदत्त क्षीरसागर बीड मधून, संदीप भूमरे पार ठाणे मधून, पांडूरंग वरोरा शहापूर मधून, अनिल राठोड नगर शहर मधून, संजय शिरसाट औरंगाबाद दक्षिण मधून, विनोद घोसाळकर श्रीवर्धन मधून, एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी मधून, रमेश बोरनारे वैजापूरमधून, उल्हास पाटील शिरोळ, विशाल कदम गंगाखेड, योगेश कदम दापोली, भास्कर जाधव गुहागर, रमेश लटके अंधेरी पूर्व, अमशा पडवी अक्कलकुवामधून, निर्मला गावित इगतपुरीमधून, विजय पाटील वसईमधून,शाहजी बापू पाटील सांगोलामधून तर महेंद्र थोरवे कर्जतमधून, अनिल बाबर खानापूरमधून, हिकमत उधाण घरसावंगीमधून अशी उमेदवारी देण्यात आली आहे.
तर संतोष बांगर कळमनुरीमधून, राजेश शिरसागर कोल्हापूर उत्तरमधून, संग्राम कुपेकर चंदगड कोल्हापूरमधून, अजय चौधरी सेवरीमधून, सुजित मिचणेकर इचलकरंजीमधून, प्रिती संजय वडनेरामधून अशी संधी देण्यात आली आहे. राजश्री पाटील नांदेड दक्षिण, महेंद्र शेठ दळवी मुरुड मधून, नागेश अष्टेकर हतगावमधून, यामिनी जाधव भायखळामधून, चिंतामण राव पाटील एरंडोल पारोळा, विठ्ठल लोआहे. वांद्रे पूर्व जागेची घोषणा करण्यात आली नाही.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...