सोनपेठ शहर सर्व शाखीय सोनार संघाच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड
सोमेश्वर आंबेकर यांची अध्यक्ष तर अतूल दहिवाळ यांची सचिव पदी निवड
सोनपेठ (प्रतिनिधी)
येथील सर्वशाखीय सोनार समाज बांधवांची सर्वसाधारण सभा नुकतीच संतशिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात आली.
यात सोमेश्वर आंबेकर यांची अध्यक्ष, किरण दहिवाळ यांची उपाध्यक्ष, अतूल दहिवाळ यांची सचिव, महेश खेडकर यांची सहसचिव पदी, सर्वश्री अनिल लोलगे, कन्हैय्यालाल वर्मा, मुंजाभाऊ दहिवाळ, संदिप टाक, ऋषिकेश खेडकर, मनोज दहिवाळ, संजय शहाणे, अमोल दहिवाळ, दिपक टाक, राहुल दहिवाळ, प्रविण कुलथे, मनोज राजूरकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली; तर समाजातील सर्व ज्येष्ठांवर संघटना बळकटीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यकरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मावळते अध्यक्ष किसनराव टाक हे होते. बैठकीची सुरूवात संतशिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली.
यावेळी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना सन्मानित करणे, समाज घटकांच्या व्यावसायिक अडीअडचणी वर मात करण्यासाठी सर्व ताकदीनिशी पाठपुरावा करणे, मंदिर विकासासाठी व संतशिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त आणि वेळोवेळी प्रसंगानुरूप राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर होणाऱ्या संभाव्य खर्चासाठी समाजबांधवांकडून निधी संकलन करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात येवून त्यास सर्वानुमते संमती देण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष सोमेश्वर आंबेकर यांनी यावेळी बोलतांना म्हणाले की, शहरातील सोनार समाजाच्या सर्वशाखीय समाज बांधवांना विश्वासात घेऊन समाज हित व मंदिर विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शेवटी नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सराफा असोसिएशनचे शहराध्यक्ष विष्णूपंत दहिवाळ, मार्तंड जोजारे, सुर्यकांत दहिवाळ, भारत दहिवाळ, वसंत खेडकर, किसन टाक, सुरेश टाक, राजेश्वर खेडकर, नंदकिशोर टाक, संतोष टाक, राजाभाऊ वेदपाठक, रामेश्वर टाक, नंदकुमार दहिवाळ, गणेश कुलथे, गोविंद पंडीत, वैजनाथ वेदपाठक, संजय पाटील आटणीवाले, ठंडी बंगाली आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन राजेश्वर खेडकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा