बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

अरे हे काय पाथरी विधानसभा ना सेनेला ना भाजपाला ही जागा आठवले गटाल,आठवले गटाकडुन मोहन फड उमेदवारी अर्ज दाखल करणार

*अरे हे काय पाथरी विधानसभा ना सेनेला ना भाजपाला ही जागा आठवले गटाला*

*आठवले गटाकडुन मोहन फड उमेदवारी अर्ज दाखल करणार*

पाथरी:-विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषना केली आहे.
गेल्या तीन दीवसांपासुन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणी प्रदेशाध्यक्ष चंन्द्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असुन अंतिम निर्णय झाला आहे.भाजपा -शिवसेना महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या सहा जागा सोडण्यात आल्याची माहीती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणी केंन्द्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दीली आहे.परंतु मोठी गंमत म्हणजे पाथरी विधासभेची जागा मीळवण्यासाठी भाजपा-शिवसेना ईच्छुक उमेदवारांनी चढा-ओढ लावली होती परंतु ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली आहे .आणी ही पाथरी विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षाकडुन मोहन फड हे लढवणार आहेत हे मात्र निश्चित झाले आहे तर उद्या दीनांक 3 आक्टोबर गुरवार रोजी समर्थकासह उमेदवारी दाखल करणार असल्याची माहीती मिळाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...