शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात,पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूद,एस.एम.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

*महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात* 

*पत्रकारावर हल्ला केल्यास तीन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपये दंडाची तरतूद*

*एस.एम.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती*

बीड, दि. १५ : महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला असून गुन्हा सिध्द झाल्यास हल्लेखोरास तीन वर्षांची शिक्षा, आणि ५० हजार रूपयांपर्यत दंडाची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आल्याची माहिती पत्रकार संरक्षण कायद्यासाठी गेली बारा वर्षे सातत्यानं लढा देणारे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम देशमुख यांनी दिली..पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यासाठी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.. प़ारभी पत्रकारांच्या वतीने अध्यक्ष सुभाष चौरे यांनी देशमुख यांनी पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार केला..
नव्या कायद्यातील तरतुदींची माहिती देताना एस.एम.देशमुख म्हणाले, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल होणारया गुन्ह्याची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकार्यांमार्फतच केली जाईल  आणि याचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोरच चालेल.. या शिवाय हल्लेखोरांनी पत्रकारावर किंवा मिडियाच्या कार्यालयांवर हल्ला करताना तेथील साहित्याची मोडतोड केली तर त्याची नुकसानभरपाई संबंधित हललेखोरांकडून जमिन महसुलाची थकबाकी होती असे समजून वसूल केली जाईल.. हललेखोरांकडून वैद्यकीय उपचाराचा खर्च देखील वसूल करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे..
मात्र खोटी तक़ार देणारया पत्रकारास देखील या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आल्याने कायद्याचा दुरूपयोग होण्याची भिती निराधार असल्याचे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले..
महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे की जेथे पत्रकारांना संरक्षण देणारा हा कायदा अस्तित्वात आला आहे अशी माहितीही एसेम यांनी दिली..
तत्पुर्वी बारा वर्षे कायद्यासाठी राज्यातील पत्रकारांनी कसा लढा दिला याची सविस्तर माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली..यावेळी पत्रकार पेन्शन योजना लागू, आरोग्य योजनेची देखील सविस्तर माहिती देशमुख यांनी  दिली.. पत्रकारांची भक्कम एकजूट, माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि आमच्या हाकेला ओ देत राज्यातील पत्रकारांनी आम्हाला खंबीर साथ दिल्याने हा कायदा होऊ शकल्याने याचे सर्वस्वी श्रेय हे राज्यातील पत्रकारांचेच असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...