रविवार, २९ डिसेंबर, २०१९

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश बिजुले तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण उजागरे यांची बिनविरोध निवड

*अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश बिजुले तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण उजागरे यांची बिनविरोध निवड*
पाथरी- अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक गोदातीर समाचारचे रमेश बिजुले यांची तर उपाध्यक्षपदी सांय.दै.परळी बुलेटीनचे लक्ष्मण उजागरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
     

      अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ पाथरी तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार विठ्ठल भिसे यांच्या अध्यक्षतेखाली (२९)रविवारी बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल भिसे, धनजंय देशपांडे,सिध्दार्थ वाव्हाळे,सुधाकर गोंगे,सुनिल उन्हाळे,खालेद नाज आदी उपस्थित होते.
याप्रसंगी रमेश बिजुले यांची अध्यक्षपदी,तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण उजागरे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी सुनिल उन्हाळे(दै.एकमत) यांची तर सहसचिव पदी खालेद नाज(मॅक्स महाराष्ट्र) तर कार्यध्यक्ष पदी सिध्दार्थ वाव्हाळे(दै.पुण्यनगरी)तर सल्लागार म्हणुन विठ्ठल भिसे (लोकमत),मोहन धारासुरकर (एकमत),सुधाकर गोंगे (पुढारी),धनंजय देशपांडे (सकाळ)यांची बिनविरोध निवड पार पडली.
       यावेळी मावळते अध्यक्ष सुधाकर गोंगे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश बिजुले व उपाध्यक्ष लक्ष्मण उजागरे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१९

तालुक्यातील विस ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींनी दीली वाळु घाटांना मान्यता.

तालुक्यातील विस ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींनी दीली वाळु घाटांना मान्यता.
पाथरी-तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात एकुण विस वाळु-घाट असुन या वर्षात लीलावासाठी पाच ग्रामपंचायतींनीच मान्यता दीली आहे.यासंदर्भातील अहवाल तहसिलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर भुजल सर्वेक्षण यंत्रणा,गोण खणीज अधिकारी यांच्याकडून दोन दीवसापुर्वी या वाळु घाटांची पाहणी करण्यात आली.
   पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात नाथरा ते मुद्गल पर्यंत एकुण विस वाळु घाट आहेत.गत वर्षात वाळु घाटातुन मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा करण्यात आला आहे. लिलाव झालेल्या घाटातुन परवाणगीपेक्षा जास्त कीतीतरी पटीने वाळुचे उत्खनन होत असते.शासनाला महसुल मिळत असला तरी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो.त्यामुळे ग्रामसभांची मान्यता दीली जात नाही.कान्सुर,उमरा आणी गुंज येथिल गावकरी लिलाव झाला तरी उपसा करण्यास प्रतिबंध घालतात. त्यामुळे येथिल वाळुघांटाचे लिलावं होतं नाहीत. या वर्षीचे लिलाव झाले नसल्याने मध्यरात्री दोन वाजल्यापासून सकाळ पर्यंत गोदावरी काठच्या  भागात वाळु चोरी होते. 2019-20 या वर्षात गोदावरी नदीच्या पात्रात वाळु घाटांच्या लीलावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रासभेची शिफारस घेण्याबाबत तहसील कार्यालयाला कळविण्यात आले होते.त्यानुसार ग्रामसभेने घेतलेल्या ठरांवाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.दोन दीवसापुर्वी नदीच्या पात्रातील वाळु घाटांचा लीलाव संदर्भात पाहणी करण्यासाठी  जिल्हा गौण खनिज अधिकारी,भुजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी आणी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुंज,उमरा,कान्सुर येथिल वाळुघांटाची पाहणी केली.आत्ता हे अधिकारी आपला अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार आहेत.त्यानंतर जिल्हाधिकारी या वाळुघाटाच्या लिलावासंर्भांत निर्णय घेणार आहेत.

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

जागृती सेवा संस्थेच्या नावाखाली बॅन्नंशी लाख रुपयांची लुट,जिल्हापरिषद शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ गायकवाड व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी_विष्णु कदम

*जागृती सेवा संस्थेच्या नावाखाली बॅन्नंशी लाख रुपयांची लुट*

*जिल्हापरिषद शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ गायकवाड व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी_विष्णु कदम*
        परभणी_ग्रामिण भागातील पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत जागृती सेवा संस्थेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस,शालेय साहित्य पुरवणार असल्याच्या कारणावरुन मागिल काही महिन्यांपासून पालकांकडून १००-२००रुपये गोळा करुन असे जवळ_जवळ  ८२,००,००० बॅन्नंशी लाख रुपययांना गंडविले असल्याची तक्रार विष्णु कदम यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या कडे केली आहे.




     जागृती संस्थेच्या नावाखाली संस्थेचे माहीती पत्रक तयार करुन ग्रामिन भागात शाळा व अंगणवाडी चर्या माध्यमातून  वाटप करुन संस्थेमार्फत शाळेतील मुला-मुलींना ड्रेस आणी शालेय साहित्य करणार असल्याचे सांगण्यात आले. व त्यासाठी पालकांकडुन प्रती विद्यार्थ्यां मागे शंभर रुपये  नोंदनी करने आवश्यक असल्याचे सांगुन लुबाडणूक करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरु आहे व यापाठी मागे जिल्हापरिषद शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ गायकवाड व प्रज्ञावंत गायकवाड असल्याची तक्रार विष्णु कदम यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जिल्हापरिषद परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या तक्रारीमध्ये संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांवर रितसर गुन्हे दाखल करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विष्णु कदम आनंदवाडी यांनी केली आहे.

शनिवार, २१ डिसेंबर, २०१९

शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

शेतकऱ्यांचं कर्ज माफ; उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

नागपूर, 21 डिसेंबर: हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. गोर-गरिबांना 10 रुपयात शिवभोजन मिळणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यासोबतच 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणाही विधासभेत करण्यात आली. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. तर 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीला महात्मा फुले कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली, ती परिपूर्ण नाही. सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. तो पाळलेला नाही, असं सांगत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारी पक्षांनी मात्र या योजनेचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आल्याचा जयंत पाटील यांचा दावा आहे.

बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

रेशन दुकानांमधून खरेदी करा मटण, अंडी, मच्छी आणि चिकन ! 

आता रेशन दुकानांमधून खरेदी करा मटण, अंडी, मच्छी आणि चिकन !

सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू कमी किंमतीत किंवा सवलतीच्या दरात मिळतात. पण लवकरच अन्नधान्यांबरोबरच स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील रेशन दुकांनावर मिळण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रेशन दुकानातून गरिबांना स्वस्त दरात चिकन, मटण आणि अंडी देखील उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे.

रेशन दुकानांवर आता पोषणयुक्त पदार्थ देण्याचा सरकारचा विचार आहे. प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांमध्ये मटण, अंडी, मच्छी आणि चिकन या खाद्यवस्तू ग्राहकांना खरेदी करता येतील. पोषण सुरक्षेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नीती आयोगाकडून ही योजना तयार केली जात आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार करून पोषण सुरक्षेला सरकार प्राधान्य देणार आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागील उद्देश आहे. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील असं सांगितलं जातंय.

नीती आयोगाचे रेशन दुकानांवरील वस्तूंची यादी आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला किमान एक ते दोन प्रोटीनयुक्त पदार्थ रेशन दुकानावर उपलब्ध केले जातील. देशातील कुपोषण आणि अ‍ॅनिमियासारख्या समस्या दूर करण्यासाठी पुढील 15 वर्षांसाठी नीती आयोगाकडून एक व्हिजन डाक्युमेंट बनवलं जाणार आहे, ज्यात पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. हे व्हिजन डाक्युमेंट 1 एप्रिल 2020 पासून लागू केले जाईल. यामुळे अन्नसुरक्षा विधेयक आणखी मजबूत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कुल जमाती तंज़ीम च्या वतीने शासकीय विश्रामगृह पाथरी येथे पत्रकार परिषद संपन्न

कुल जमाती तंज़ीम च्या वतीने शासकीय विश्रामगृह पाथरी येथे पत्रकार परिषद संपन्न:
       पाथरी प्रतिनिधी-पाथरी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे  दिनांक 18 डिसेंबर  बुधवार दुपारी 3 च्या दरम्यान पाथरी येथील कुल जमाती तंज़ीम( सर्व पक्षीय संघटन)च्या वतीने घेण्यात आलेली पत्रकार परिषदेत मो. शफ़ीयोद्दीन फारोखी या पञकार परीषेदेत माहीती देतांना सांगितले की येत्या शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता पाथरी चौक बाजार पाथरी ते तहसील कार्यालय  CAA आणि  NRC च्या विरोधात  सर्व पक्षीय व सर्व धर्मीय मुकमोर्चा  काढण्यात येणार आहे.


या मुक मोर्चाच्यात संविधान प्रेमी नागरीकांनी या मोर्चे मध्ये आपले सहभाग नोंदवावा असे आहवान या वेळी सांगीतले आहे.तसेच हा मोर्चा सर्व पक्षीय संघटन तर्फे करण्यात आले.
या मोच्यात   भारत मुक्ति मोर्चा,बामसेफ,भारतीय विद्यार्थी मोर्चा,संभाजी ब्रिगेड,जमआते इस्लामी हिन्द, वहदत इस्लामी,जमीअतउलमा,अहलेहदीस, तब्लीगी जमाअत, राष्ट्रीय विद्यार्थी कांग्रेस,मावळा विद्यार्थी महासंघ,वंचित आघाडी, महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद, CPI पाथरी,महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान आदी सहभाग राहणार आहे.
या पञकार परीषेदत कुल जमाती तंजीम पाथरी अध्यक्ष हाफिज अ.जब्बार खाॅन,उपाध्यक्ष मो.शफीयोद्दीन फारोखी,सचिव नईम अन्सारी आदी उपस्थीतित होते.

थेट सरपंच,थेट नगराध्यक्ष निवड रद्द; विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर

*थेट सरपंच,थेट नगराध्यक्ष निवड रद्द; विधानसभेत विधेयक बहुमताने मंजूर* 
नागपूर(अधिवेशन) :- सन २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग पध्दत सुरू झाली. तसेच नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पध्दत लागू केली होती. भाजपच्या या सर्व पध्दतींवर अंकूश आणण्यासाठी ठाकरे सरकारने आज अधिवेशनामध्ये ही पद्धत रद्द करण्याचे विधेयक बहुमताने मंजूर करून फडणवीस सरकारच्या या निर्णयला लगाम घातला आहे.
फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी २०१६ साली नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नवीन पद्धत सुरु केली होती.
   फेब्रुवारी २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकांसाठी दोन महत्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग पद्धत. पूर्वी नगरसेवक एकाच प्रभागातून निवडून येत होता.मात्र, नवीन पद्धतीनुसार चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाल्याने त्याला आपल्या प्रभागाव्यतिरिक्त अन्य तीन प्रभागामध्येही निवडून यावे लागत होते.
 तर,दुसरा निर्णय म्हणजे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडण्याची पद्धत. हे दोन्ही निर्णय रद्द करण्यासाठी ठाकरे सरकारने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यातच आज हे विधेयक मांडण्यात आले आणि तातडीने हे  बहुमताने मंजूरही करून घेण्यात आले . मात्र मुंबई मनपा वगळता अन्य पालिकेतील ४ प्रभाग पद्धतही रद्द करण्यात आली आहे.
  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांचा महाविकासआघाडीला फटका बसत होता. त्यामुळेच ही पद्धत रद्द करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती.या एकसदस्यीय पद्धतीमुळे केवळ एकाच प्रभागात प्रभाव असलेल्या उमेदवाराची अन्य प्रभागातून पिछेहाट होत होती.भाजपची प्रभावी प्रचारयंत्रणा याचा फायदा उचलत यश संपादित करत होती. त्यामुळेच महाविकास आघाडीतील पक्षांचा या पद्धतीला विरोध होता. त्यामुळे  थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडीमुळे जास्त सदस्य असलेल्या पक्षालाही सरपंच विरोधीपक्षाचा निवडून आला तर त्यावरच अवलंबूर राहावे लागत होते. मात्र आता या निर्णयाला लगाम बसणार असून पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष व सरपंच निवडला जाणार आहे.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१९

पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू व्हावा :एस.एम.देशमुख*

*पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू व्हावा :एस.एम.देशमुख* 

पनवेल : पत्रकार संरक्षण कायदा केंद्र सरकारने संमत करून तो देशभर लागू करावा, यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा नुकताच लागू झाला आहे.. त्यासाठी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखीलील सलग १२ वर्षे राज्यातील पत्रकारांनी लढा दिला आहे.. अखेर हा लढा यशस्वी झाला आणि ७ डिसेंबर २०१९ पासून हा कायदा राज्यात लागू झाला.. कायदा व्हावा यासाठी देशमुख आणि किरण नाईक यांनी अथक प्रयत्न केले.. त्याबद्दल रायगड प़ेस क्लबच्यावतीने देशमुख आणि नाईक यांचा आज रसायनी येथे  ज्येष्ट पत्रकार, प़काश जोशी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.. त्यावेळी देशमुख बोलत होते..
आपल्या भाषणात देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजनेसाठीचा लढा अंत पाहणारा होता.. निराश करणाराही होता.. मात्र राज्यातील पत्रकारांची एकजूट, मला दिलेली खंबीर साथ आणि माझ्यावर दाखविलेला विश्वास यामुळे जिद्दीने ही लढाई लढलो आणि त्यात आपण यशस्वी झालो असे मत व्यक्त केले.. या लढयात रायगडमधील पत्रकारांचे योगदान मोठे होते प्रत्येक आंदोलनात रायगडच्या पत्रकारांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता याची आठवण देशमुख यांनी यावेळी करून दिली.. . रायगड ही माझी कर्मभूमी आहे.. माझ्या कर्मभूमीत होणारा माझा सत्कार माझ्यासाठी लाख मोलाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या..
पत्रकार पेन्शन आणि कायदयासाठीची लढाई कठीण होती.. मात्र एस. एम.देशमुख यांचे खंबीर नेतृत्व आणि त्यांना आपण दिलेली साथ यामुळे हे दोन्ही निर्णय झाले आहेत.. हे दोन्ही निण॓य ए्तिहासिक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प़काश जोशी त्यांनी व्यक्त केले..कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी आता काळजी घ्यावी लागेल याची जाणीव त्यांनी करून दिली.. 
यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार, मिलिंद अष्टीवकर, नागेश कुलकर्णी आदिंची भाषणं झाली. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी प्रास्ताविक केले.. यावेळी शोभना देशमुख तसेच रायगड प़ेस क्लबच्या माजी अध्यक्षांचाही सत्कार करण्यात आला... कार्यक़मास जिल्हयातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते..

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

पाथरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता बैठक संपन्न

पाथरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता बैठक संपन्न...... 
------------------‐-------
पाथरी (लक्ष्मण उजागरे):--पाथरी शहरात दि. 15 डिसेंबर रविवार रोजी पाथरी,मानवत व सोनपेठ तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांची बैठक परभणी जिल्हा अध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.       
यावेळी या बैठकीला जिल्हा संघटक धाराजी भुसारे जिल्हा उपाध्यक्षा राजश्री थोरात पाथरी तालुका अध्यक्ष श्याम रणेर उपाध्यक्ष नागनाथ कदम सचीव डाॅ. आण्णासाहेब जाधव, सेलू तालुका अध्यक्ष आण्णा कोप्पलवार तसेच कमलताई राठोड आदींची उपस्थिती होती.
यावेळी डाॅ. विलास मोरे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने आंदोलने करून ग्राहक संरक्षण कायदा कशा प्रकारे अस्तित्वात आणला याचा संपूर्ण इतिहास थोडक्यात सांगुन या कायद्याचे संपूर्ण ज्ञान प्रत्येक नागरीकास झाले तर वेळोवेळी ग्राहकांच्या होणा-या लुटी ला आळा बसेल तसेच विकत घेतलेला माल ग्राहकांना योग्य दरात भेटून ग्राहकांना फसवणुकीचा धोका होणार नाही.
त्यासाठी संपूर्ण  जिल्हाभर ग्राहक पंचायत च्या वतीने जण जागृती मेळावे तसेच नवीन सदस्यांची नोंदणी सुरू झाली असल्याची माहीती दिली. यावेळी बालासाहेब गमे पाटील,गोपाळ कच्छवे,सुंदर शेजुळ,पाराजी विभुते, आदींची उपस्थिती होती.

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

ढालेगाव येथे छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर रेती चोरी

*ढालेगाव येथे छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर रेती चोरी*
पाथरी-तालुक्यातील ढालेगाव येथे बेसुमार रेती चोरी होत आहे मात्र महसुली प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेत असल्याचं दीसून येत.
           ढालेगाव येथे काही वाहन मालक रात्रीच्या वेळी नऊच्या नंतर ट्रॅक्टरने गावातील वाहन मालक बेसुमार रेती चोरी होत आहे मात्र महसुल प्रशासन झोपेच सोंग म्हणा की काही अर्थपुर्ण व्यवहार करुन या रेती चोरांवर वरदहस्त म्हणाव लागेल.याकडे वेळीच महसूल प्रशासन लक्ष देईल का आणी या रेती चोरांचा बंदोबस्त होईल का हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...