पाथरी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्ता बैठक संपन्न......
------------------‐-------
पाथरी (लक्ष्मण उजागरे):--पाथरी शहरात दि. 15 डिसेंबर रविवार रोजी पाथरी,मानवत व सोनपेठ तालुक्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्यकर्त्यांची बैठक परभणी जिल्हा अध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी या बैठकीला जिल्हा संघटक धाराजी भुसारे जिल्हा उपाध्यक्षा राजश्री थोरात पाथरी तालुका अध्यक्ष श्याम रणेर उपाध्यक्ष नागनाथ कदम सचीव डाॅ. आण्णासाहेब जाधव, सेलू तालुका अध्यक्ष आण्णा कोप्पलवार तसेच कमलताई राठोड आदींची उपस्थिती होती.

यावेळी डाॅ. विलास मोरे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने आंदोलने करून ग्राहक संरक्षण कायदा कशा प्रकारे अस्तित्वात आणला याचा संपूर्ण इतिहास थोडक्यात सांगुन या कायद्याचे संपूर्ण ज्ञान प्रत्येक नागरीकास झाले तर वेळोवेळी ग्राहकांच्या होणा-या लुटी ला आळा बसेल तसेच विकत घेतलेला माल ग्राहकांना योग्य दरात भेटून ग्राहकांना फसवणुकीचा धोका होणार नाही.
त्यासाठी संपूर्ण जिल्हाभर ग्राहक पंचायत च्या वतीने जण जागृती मेळावे तसेच नवीन सदस्यांची नोंदणी सुरू झाली असल्याची माहीती दिली. यावेळी बालासाहेब गमे पाटील,गोपाळ कच्छवे,सुंदर शेजुळ,पाराजी विभुते, आदींची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा