*जागृती सेवा संस्थेच्या नावाखाली बॅन्नंशी लाख रुपयांची लुट*
*जिल्हापरिषद शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ गायकवाड व संबंधितांवर कार्यवाही करण्यात यावी_विष्णु कदम*
परभणी_ग्रामिण भागातील पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत जागृती सेवा संस्थेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस,शालेय साहित्य पुरवणार असल्याच्या कारणावरुन मागिल काही महिन्यांपासून पालकांकडून १००-२००रुपये गोळा करुन असे जवळ_जवळ ८२,००,००० बॅन्नंशी लाख रुपययांना गंडविले असल्याची तक्रार विष्णु कदम यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या कडे केली आहे.
जागृती संस्थेच्या नावाखाली संस्थेचे माहीती पत्रक तयार करुन ग्रामिन भागात शाळा व अंगणवाडी चर्या माध्यमातून वाटप करुन संस्थेमार्फत शाळेतील मुला-मुलींना ड्रेस आणी शालेय साहित्य करणार असल्याचे सांगण्यात आले. व त्यासाठी पालकांकडुन प्रती विद्यार्थ्यां मागे शंभर रुपये नोंदनी करने आवश्यक असल्याचे सांगुन लुबाडणूक करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरु आहे व यापाठी मागे जिल्हापरिषद शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ गायकवाड व प्रज्ञावंत गायकवाड असल्याची तक्रार विष्णु कदम यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी जिल्हापरिषद परभणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या तक्रारीमध्ये संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांवर रितसर गुन्हे दाखल करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विष्णु कदम आनंदवाडी यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा