मंगळवार, १४ जानेवारी, २०२०

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी-अमोल भालेपाटील

पाथरी_'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी मावळा युवा महासंघाचा वतीने पाथरी तहसीलदार यांना करण्यात आली 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याची जगाच्या पातळीवर कोणीही तुलना करू शकत नाही परंतु भाजपा नेते भगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे ही घटना अतिशय निंदनीय असून याला भाजपाचा पाठिंबा दिसतो अशा प्रकारचे पुस्तक लिहून गोयल यांनी नीच्य पातळी गाठली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील व जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची कुणी बरोबर करू शकत नाही त्यामुळे या पुस्तकाचा व घटनेचा मावळा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच पुस्तक लिहिणार्या जय भगवान गोयल यांच्यावर  कारवाई करून पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय तहसीलदार साहेब पाथरी यांना करण्यात आली आहे यावेळी मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भाले पाटील यांनी केली आहे. यावेळी वक्ता जिल्हा अध्यक्ष सुनील जाधव युवक जिल्हाध्यक्ष अतुल टेकाळेूू पुरोगामी विचार मंच चे तालुका प्रभारी सतीश गवारे तालुका उपप्रभारी महादेव गवारे  तालुका सल्लागार अनिल गालफाडे,वकील  ऍड  बी .जे गायकवाड शिवभक्त राजेश नवले गणेश थावरकर शेतकरी चक्रधर टेकाळे माऊली काळे तुशन  भाले पाटील राहुल वानखेडे राजेंद्र माने व सर्व शिवभक्त यावेळी निवेदन देताना उपस्थित होते .लवकरात लवकर जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करून ह्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी जर बंदी नाही आली तर मावळा युवा संघाच्या वतीने राज्यभरात तीव्र प्रकारच्या आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भालेपाटील यांनी यावेळी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...