शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

नवनियुक्त DCPU युनिटची संकल्प संस्थेस भेट... बाल कल्याण समिती,जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि संकल्प मानव विकास यांची संयुक्त बैठक दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी संकल्प ऑफिस येथे बैठक संपन्न झाली.

नवनियुक्त DCPU युनिटची संकल्प संस्थेस भेट...

बाल कल्याण समिती,जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि संकल्प मानव विकास यांची संयुक्त बैठक दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी संकल्प ऑफिस येथे बैठक संपन्न झाली,

बाल संरक्षण कक्ष नियुक्त झाल्यावर प्रथम संकल्प संस्थेस भेट दिली,बैठकीस बाल कल्याण समिती चे अध्यक्ष एड.संजय केकान, संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक सुधाकर क्षीरसागर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अर्चना मेश्राम, संकल्प समन्वयक विठ्ठल साळवे, बालासाहेब खोपे, राजू साठे उपस्थित होते, बैठकीत बालकांच्या संरक्षणासाठी गाव बाल संरक्षण समिती कार्यरत करणे गरजेचे आहे, संकल्प संस्था आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला, बैठकीच्या शेवटी संकल्प संस्थेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब आणि  मा.जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी जिल्हा संरक्षण कक्षाच्या सर्व नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले, 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल साळवे, बालासाहेब खोपे, राजू साठे, निर्मला राठोड, नंदा शेरकर, सिद्धार्थ वैराळे, बालाजी सोगे यांनी परिश्रम घेतले

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार 2019 ने शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल सन्मानित.

पाथरी प्रतिनिधी :-महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार 2019,पाथरी येथील शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांना डाँ शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे दि 16/2/2020 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने राज्यातील कलावंतानी विविध क्षेत्रात विशेष कामगीरी करुण, व त्यांच्या कलेतुन समाज प्रबोधन होत असणा-या कलावंताचा महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून सदरील कार्यक्रम डॉ शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे दि 16/2रोजी संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण हे होते तर उदघाटक खा प्रतापराव पाटील चिखलीकर विशेष उपस्थिती माजी खा डॉ व्यंकटेश काब्दे हे होते तर प्रमुख उपस्थिती महापौर सौ दिशाताई धबाले ,जि प आध्यक्ष मंगाराणी अंबलगेकर, आ बालाजी कल्याणकर, आ मोहण अण्णा हंबर्डे, आ आमरभाऊ राजुरकर आदि होते .
पाथरी येथील शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल हे 1990पासुन व्यवसाय करत असुन त्यांनी घडवलेल्या देवी-देवता, महापुरुष आदींच्या मुर्ती हुबेहूब तयार करण्याची कला त्यांना अवगत आहे म्हणून त्यांनी तयार केलेल्या मुर्ती मुंबई ,पुणे ,बिड नांदेड व विदर्भातील काही भागात गेल्या आहेत .दगडाला आकार देऊन, देवपण देणा-या शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांनी बनवलेल्या मुर्तीस मागणी मोठ्या प्रमाणात होत असलेली दिसुन येत आहे अशा या पाथरी तालुक्यातील कलावंत शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांचा महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून त्यांचे तालूक्यात अभिनंदन होत आहे

महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार 2019 ने शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल सन्मानित.

पाथरी प्रतिनिधी :-महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार 2019,पाथरी येथील शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांना डाँ शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे दि 16/2/2020 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने राज्यातील कलावंतानी विविध क्षेत्रात विशेष कामगीरी करुण, व त्यांच्या कलेतुन समाज प्रबोधन होत असणा-या कलावंताचा महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून सदरील कार्यक्रम डॉ शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे दि 16/2रोजी संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण हे होते तर उदघाटक खा प्रतापराव पाटील चिखलीकर विशेष उपस्थिती माजी खा डॉ व्यंकटेश काब्दे हे होते तर प्रमुख उपस्थिती महापौर सौ दिशाताई धबाले ,जि प आध्यक्ष मंगाराणी अंबलगेकर, आ बालाजी कल्याणकर, आ मोहण अण्णा हंबर्डे, आ आमरभाऊ राजुरकर आदि होते .
पाथरी येथील शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल हे 1990पासुन व्यवसाय करत असुन त्यांनी घडवलेल्या देवी-देवता, महापुरुष आदींच्या मुर्ती हुबेहूब तयार करण्याची कला त्यांना अवगत आहे म्हणून त्यांनी तयार केलेल्या मुर्ती मुंबई ,पुणे ,बिड नांदेड व विदर्भातील काही भागात गेल्या आहेत .दगडाला आकार देऊन, देवपण देणा-या शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांनी बनवलेल्या मुर्तीस मागणी मोठ्या प्रमाणात होत असलेली दिसुन येत आहे अशा या पाथरी तालुक्यातील कलावंत शिल्पकार प्रकाश मारोतराव दाढेल यांचा महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्र भूषण व जिवण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून त्यांचे तालूक्यात अभिनंदन होत आहे

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव ; शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव यांचे प्रतिपादन .

शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .

पाथरी (प्रतिनिधी)"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि कसलीही मदत करण्यास शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही जिल्हाचे खा . संजय जाधव यांनी दिली
ते सार्वजनिक शिवजयंतीनिमित्य आयोजीत सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते .शिवसृष्टी प्रतिष्ठान व राजे संभाजी प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजन केले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी अजय चौधरी, सभापतीपदी गंगाप्रसाद आनेराव, दादासाहेब टेंगसे आणि पाथरी पंचायत समिती सभापतीपदी सौ.थोरात यांची निवड झाल्याबद्दल कानसुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .
कार्यक्रमाला सुभाषआबा कोल्हे, विष्णू मांडे, सहसंपर्कप्रमुख प्रा.धोंडगे सर, माणिकअप्पा घुंबरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आमले तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे व आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी
मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव ; शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव यांचे प्रतिपादन .

शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .

पाथरी (प्रतिनिधी)"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि कसलीही मदत करण्यास शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही जिल्हाचे खा . संजय जाधव यांनी दिली
ते सार्वजनिक शिवजयंतीनिमित्य आयोजीत सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते .शिवसृष्टी प्रतिष्ठान व राजे संभाजी प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजन केले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी अजय चौधरी, सभापतीपदी गंगाप्रसाद आनेराव, दादासाहेब टेंगसे आणि पाथरी पंचायत समिती सभापतीपदी सौ.थोरात यांची निवड झाल्याबद्दल कानसुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .
कार्यक्रमाला सुभाषआबा कोल्हे, विष्णू मांडे, सहसंपर्कप्रमुख प्रा.धोंडगे सर, माणिकअप्पा घुंबरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आमले तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे व आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी
मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

सिलेंडरचे दर गगनाला: उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले

सिलेंडरचे दर गगनाला: उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले
पाथरी:-शहरात व ग्रामीण परिसरातील घरा घरात गरीब कुटुंबाना केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्वला गॅस योजनेतून मोठा गाजावाजा करून दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत सिलेंडर देण्यात आले. मात्र काही महिन्यातच सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सिलेंडरचे दर ९०० रुपये जवळपास झाल्याने आता उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गॅस ऐवजी घराघरातून धूर निघताना दिसत असून काही महिन्यातच योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
   गरीब महिलांनी कनेक्शन घेतले खरे काही महिनेच त्याचा वापर झाला. दुसरा सिलेंडर आणायचा म्हटले तर ९०० रुपये जवळपास लागत आहेत. उज्वला योजनेत समाविष्ट लाभार्थींना हा दर परवडणारा नसल्याने महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत.
  सर्वदूर पसरलेला दुष्काळ. गावात काम नाही. खिशात दाम नाही. अशा परीस्थितीत एकदाच ९०० रु सिलेंडरसाठी देणे शक्य नसल्याने गरीब जनता शेतातून तुराट्या, लाकूड जमा करत आहे. आता तर शेतात तुराटी भरपूर असल्याने महिला ‘नको ग माय एवढा म्हाग गॅस, धुर लागो कि डोळे लाल हो, हेच पैसे घर प्रपंचासाठी व लेकरांच्या शिक्षणासाठी कामाला येतील’ अशी भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
शासन वर्षाला बारा सिलेंडर देते. उज्वला योजनेतील गॅस धारकांना वर्षाला सहा सिलेंडर द्या मात्र एका सिलेंडरचा ३०० रु. दर स्थिर ठेवा. सरकारला खरोखरच गरीबांची काळजी असेल तर दोन महिन्याला एक गॅस सिलेंडर ३०० रूपये दराने द्यावा, अशी मागणी महिला करताना दिसत आहेत.

गुटखा बंदी’ केवळ नावापुरती पाथरी दरमहा लाखो रुपयांची उलढाल; हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री

*गुटखा बंदी’ केवळ नावापुरती हप्तेखोरी,पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री*

‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती
पाथरी दरमहा लाखो रुपयांची उलढाल; हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री

पाथरी:-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. परराज्यातील गुजरात आणि कर्नाटक भागातून पाथरीत गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो.पाथरी शहरातील पोलीस ठाण्खोयाच्या अगदी हाकेच्या अंतरातुन हा गुटखा वितरीत करण्यात येतो, या पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोस सुरू असून एकटय़ा पाथरीत शहर परिसरात बेकायदा गुटखा विक्रीतून लाखो रुपयांची उलढाल दरमहा होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
  आघाडी सरकारने गुटखा बंदी लागू केली. शालेय, महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर होते.त्यामुळे गुटखा बंदी लागू करण्यासाठी आघाडी सरकारने प्रयत्न  केले. त्या वेळी अनेक गुटखा उत्पादकांनी राज्य सरकारावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने गुटखा बंदी लागू करण्याचे आदेश दिले. त्या वेळी राज्य सरकारने गुटखाविक्रीतून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा महसुलावर पाणी सोडले होते. गुटखा बंदीला पाच वर्ष झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे. गुटखा बंदी नावापुरती आहे. खेडापाडय़ापासून ते मोठय़ा शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होते. गुटखा उत्पादक, बेकायदा वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे. पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुटखा विक्रीचे जाळे निर्माण केल्याचे एका गुटखा वितरकाने सांगितले.

*हवालामार्फत व्यवहार;बाहेर राज्यातील व्यापारी सामील*

पाथरी गुटखा विक्रीसाठी बाहेर राज्यातील व्यापारी सामील आहे. त्याला पाथरीतील वितरक हवालामार्फत पैसे पाठवितात. तेथून गुजरातमधून गुटखा परभणी व माजलगाव मार्गे पाथरीत विक्रीसाठी पाठविला जातो. गुजरातमधून व कर्नाटक येथुन वाहतूकदारांकडून पाथरीत कंटेनरने गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. तेथून गुटख्याचे पुडे शहरातील ग्रामिण भागात किरकोळ विक्रेत्यांकडे पाठविले जातात. फेरीवाले त्यांच्याकडून गुटखा खरेदी करून पानपट्टीचालकांना विकतात.पाथरी शहरात दररोज स्कुटी व अॅटो कंटेनरमधून गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. एका कंटनेरमधून साधारणपणे हजारो रुपयांचा माल विक्रीसाठी पाठविला जातो.पाथरीत गुटखा विक्रीचा हिशोब केल्यास दरमहा लाखो रुपयांची उलढाल होते.

कारवाई नावापुरती; हप्तेखोरीमुळे यंत्रणा पोखरलेली

गुटखा बंदीचा आदेश नावापुरता आहे. जुजबी कारवाई करून गुटखा विक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि त्या बदल्यात गुटखा उत्पादकांकडून हप्ते घ्यायचे. पोलीस तसेच अन्न व औषध विभागातील काहींच्या छुप्या पाठिंब्यावर पुणे, मुंबई तसेच राज्यभरात गुटखा विक्रीचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. हप्तेखोरीमुळे संपूर्ण यंत्रणा पोखरली असून गुटखा बंदी कागदावर असल्याची माहिती गुटखा विक्रेत्यांकडून देण्यात आली.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

*परभणी येथून मोठा धारदार शस्त्र साठा जप्त;परभणी विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी*

*परभणी येथून मोठा धारदार शस्त्र साठा जप्त;परभणी विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी.*
 परभणी:-परभणी येथील तुराबुल हक दर्गा परभणी येथील उरुस यात्रेमध्ये प्लास्टिक ताडपत्री लावून जनरल स्टोअर्स दुकानातून धारदार शस्त्रसाठा विक्री होत असल्याची गुपीत खबर परभणी येथील विशेष पथकाला मिळाल्यानंतर दिनांक 17 रोजी रात्री ठीक 09: 45 मिनिटांनी छापा टाकण्यात आला.
   या छाप्यात पाच गुस्त्या, एक लोखंडी खंजीर, पाच लहान लोखंडी खंजीर, फायर सारखे साचे असलेली आठ लहान खंजीर, एक मोठा लोखंडी चाकू, दोन लहान लोखंडी चाकू, व आठ धारदार चाकू, असे तीस तीक्ष्ण धारदार मनुष्य जीव जाईल असे घातक हत्यार किमती 10,000 रुपये तसेच त्यांच्या साठ्यातून हत्यार विक्री करून जमा झाल्याने 11,330 रुपये नगदी व दोन मोबाईल 15,000 रुपये असा एकूण 36 हजार 330 रुपयांचे चार आरोपी यांना ताब्यात घेतले आहे.
   आरोपी नामे शेख अजीम शेख अकबर, शेख रहीम शेख अकबर, सय्यद फेरोज सय्यद रजाक, आणि सलमान पठाण फय्याज पठाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन परभणी याठिकाणी आर्म ॲक्ट तसेच भा.द.वि. कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
  सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती राग सुधा मॅडम परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. हनुमंत पांचाळ,ASI हनुमान कच्छवे, पो.हे.कॉ. जगदीश रेड्डी,पो.कॉ. श्रीकांत घनसावंत,अतुल कांदे, पूजा भोरगे आणि गजेंद्र चव्हाण यांनी दमदार अशी धडाकेबाज कामगिरी केली आहे.

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

*कोरोना व्हायरस वर डॉ शिंदे यांचे मार्गदर्शन*

कोरोना व्हायरस वर डॉ शिंदे यांचे मार्गदर्शन
पाथरी:(प्रतिनिधी )-जागतीक स्तरावर चीन मध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरस मुळे चिंतेचे वातावरण असतांना. या वर खास असे आैषधी नसल्याने या पासून बचावाच्या उपाय योजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या विषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यां मध्ये जागृती करण्या सह समाजात या विषयीची माहिती जावी या अनुषंगाने डॉ जगदिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन स्व नितिन महाविद्यालयात करण्यात आले होते.
सायन्स विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ जे एम बोचरे, प्रा डॉ हरी काळे, प्रा अर्चना बदने, प्रा डॉ शितल गायकवाड, यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी कोरोना व्हायरस पासून कसा बचाव करता येऊ शकतो या विषयी डॉ जदिश शिंदे यांनी मार्गर्शन केले. गर्दिच्या ठिकाणी जाने टाळा, सर्दी अलेल तर हास्तांदोलन करने टाळा. नियमित पणे हात धुवा. आणि सर्दी ताप असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे या वेळी डॉक्टरांनी सांगुन महिलां, मुलींनी डायट वर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले.मांस स्वच्छ धूऊन मगच खावे असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी या विषयी डॉ शिंदे यांना प्रश्न विचारले त्यांचे समाधानकारक उत्तरे डॉ शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप प्राचार्य डॉ राम फुन्ने यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा रंजित गायके यांनी केले तर आभार कु घांडगे यांनी मानले. सोमवारी १७ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमा साठी मोठ्या संखेनेने विद्यार्थी,विद्यार्थीनी,शिक्षकेत्तर कर्मचारी,प्राध्यापक मोठ्या संखेने उपस्थित होते.

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

*शेतात दारू पिण्यास विरोध केला शेतमालकास बेदम मारहाण;तिघांविरुद्ध पाथरी पोलिसात गुन्हा दाखल.*

शेतात दारू पिण्यास विरोध केला शेतमालकास बेदम मारहाण; तिघांविरुद्ध पाथरी पोलिसात गुन्हा दाखल.
पाथरी:-तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये असणाऱ्या शेतात संध्याकाळच्या वेळी अवैधरित्या दारू पीत बसलेल्या व्यक्तींना शेतमाल मालकाने हटकले असता, शेतमालकालाच बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असुन यामध्ये मारहाण करून पळून जाणाऱ्या तिघांपैफी एकास पकडल्यामुळे या घटनेतील आरोपींवर पाथरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    तालुक्यातील वाघाळा गाव शिवारामध्ये असणाऱ्या पारधी शेतवस्तीवर सेवानिवृत्त पोलीस शिपाई तुकाराम धारोजी पवार वय ६८ राहतात. शुक्रवारी संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान जेवण केल्यानंतर ते नित्य नियमाप्रमाणे शेतामध्ये फेरफटका मारण्यास निघाले होते यावेळी त्यांच्या शेतातील पाण्याच्या होता जवळ तिघेजण अवैधरित्या दारू पिताना आढळून आले यावेळी या तिघांना त्यांनी दारू पिण्यास विरोध केला यामुळे चिडलेल्या तिघांनी मिळून तुकाराम पवार यांना बेदम मारहाण केली यावेळी तुकाराम पवार यांच्या हातातील बॅटरी घेऊन त्यांच्या डोक्यात मारण्यात आल्याने त्यांनी आरडाओरड केली यावेळी वस्तीवर राहणारा त्यांचा मुलगा पंढरी पवार हा धावून आला आरडाओरडा होत असल्याने तिघांनी मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या धरपकडीमध्ये  अंकुश वाघमारे नामक इसमास पंढरी पवार यांनी धरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये हजर केले असता पळून गेलेले केशव जावळे व कल्पेश गव्हाणे यांच्याविरुद्ध तुकाराम पवार यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

वाघाळा येथे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन,रक्तदान शिबिराचे होणार सुरुवात,कलामहोत्सव सह व्याख्यानांचे आयोजन

वाघाळा येथे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन.


रक्तदान शिबिराचे होणार सुरुवात.


कलामहोत्सव सह व्याख्यानांचे आयोजन.



पाथरी (प्रतिनिधी)तालुक्यातील वाघाळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती चे भव्य आयोजन करण्यात आले आहे .यावेळी तीन दिवसीय शिवजन्मोत्सव व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

   तालुक्यातील वाघाळा येथे छत्रपती शिवरायांचा ३७ वर्षापूर्वी
स्थापित अर्धपूर्णाकृती पुतळा असुन त्यामुळे या गावातील शिवभक्त मागील अनेक वर्षांपासून शिवजयंती अत्यंत थाटामाटात साजरी करतात. मागील पाच वर्षापासून यामध्ये कला महोत्सव व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची भर पडली आहे. त्यामुळे येथील शिवजयंती तीन दिवस साजरी करण्यात येते .या वेळीही १७ फेब्रुवारी पासून शिवजयंती महोत्सवात सुरुवात होणार आहे .प्रारंभी सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या दिवशी संध्याकाळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व तहसीलदार परभणी, विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे . यावेळी पाथरीचे पोलिस निरिक्षक दिपक शिंदे , वनरक्षक व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते अविनाश भारती यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. तर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी  दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शिवचरित्रावर आधारित  चार विषयांवर जिल्हाभरातून आलेले लहान व मोठ्या  शालेय गटातील मुली व मुले भाषण करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ८ वाजता ह-भ-प शिवचरित्रकार संगीताताई व्यवहारे यांचा  प्रबोधन किर्तनाचे  आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी रुद्रभिषेक व त्यानंतर भव्य पालखी सोहळा आयोजित केला असून सायंकाळी सात नंतर सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. दरम्यान या महोत्सवामध्ये  सहभागी स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी या तीनदिवसीय शिवजन्मोत्सव यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक ,समस्त गावकरी मंडळी वाघाळा यांनी केले आहे.

*शिवजन्मोत्सवाचा रंगणार शानदार सोहळा;कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजन.*

शिवजन्मोत्सवाचा  रंगणार शानदार सोहळा.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजन.

पाथरी (वार्ताहर:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.बाजार समिती प्रांगणात भव्य शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन त्या निमित्त शिवव्याख्यान आयोजीत केले आहे.अशी माहीती कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.
               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवश्री बाबाजाणी दुर्राणी हे राहणार आहेत तर प्रमुख व्याख्याते म्हणून आंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध व्याख्याते शिवश्री अविनाश धायगुडे यांची उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी कृउबास चे सभापती अनिलराव नखाते ,उपसभापती एकनाथराव शिंदे संचालक माधवराव जोगदंड, प्रभाकर शिंदे,बाळासाहेब कोल्हे,सुरेश ढगे,लहु घांडगे,रूस्तुम झुटे,गणेश घुंबरे,नारायणराव आढाव,राजेश्वर गलबे,भगीरथ टाकळकर,एकनाथ सत्वधर,दगडुबा दुगाणे,विश्वांभर साळवे,बाबासाहेब कुटे,सय्यद गालेब,आश्रोबा शिंदे ,प्रभारी सचिव बि.जी.लिपने यांची उपस्थिती राहणार आहे.
               पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती ने अल्पावधीतच कुशल प्रशासन चालवित महाराष्ट्रात भुषणावह अशी नाविण्यपूर्ण अशी स्वतः ची भव्य प्रशासकीय ईमारत उभी केली.शासकीय विश्रामगृहाच्या धर्तीवर उभारण्यात आलेली हि ईमारत अनेकांचे लक्ष वेधुन घेत आहे.विशेष बाब म्हणजे पाथरी शहराचे वैभव असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वरूढ पुतळा या बाजार समिती प्रांगणात स्थापीत करण्यात आलेला आहे.शिवजन्मोत्सवाचे निमितांने येथे बाजर समितीच्या वतीने विशेष अशा शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, चेअरमन,विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक, व शेतकरी बांधवांनी उपस्थितीत रहावे असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पाठक यांनी केले आहे.या सोहळ्यानिमित्त विविध स्वागत कमानी उभारण्यात आल्या असुन भगवे ध्वज यामुळे एक आनंदायी वातारणात होणारा हा सोहळा लक्षवेधक ठरणार आहे.

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा

सरकारी कर्मचाऱ्यांचा आठवडा आता पाच दिवसांचा
___________________________________

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी गुड न्यूज दिली आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला ठाकरे सरकारनं अखेर मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
२९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अमलबजावणी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्यद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी बैठक घेतली होती. अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस विनायक लहाडे, डॉ. सोनाली कदम, तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत पाच दिवसांचा आठवडा करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते.महासंघाच्या वतीने कुलथे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यात केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत अनुकूलता दर्शविली. ४५ मिनिटे वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितलं होतं.या प्रस्तावावर बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळानं पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. या निर्णयाची अमलबजावणी महिना अखेरीस म्हणजेच २९ फेब्रवारीपासून करण्यात येणार आहे.

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

*हादगांव बु सोसायटीवर सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व कायम,८ संचालकांचा मोठ्या मताधिक्याने विजय,५ संचालकांची बिनविरोध निवड*

हादगांव बु सोसायटीवर सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व कायम

८ संचालकांचा मोठ्या मताधिक्याने विजय

५ संचालकांची बिनविरोध निवड

पाथरी (वार्ताहर):-पाथरी तालुक्यातील हादगांव बु येथील राजकीय दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत कृऊबास चे सभापती अनिल नखाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पँनलचे ८ संचालक मोठ्या मताधिक्याने विजय झाले तर ५ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने येथे सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व सिध्द झाले.
                   हादगांव बु.विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक २ फेब्रुवारी रोजी पार पडली.या निवडणुकीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृउबास सभापती अनिल नखाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणीत शेतकरी विकास पँनलचे प्रकाश बोलाजी कदम,लक्ष्मीबाई आबासाहेब नखाते, अनिता बिबिशन नखाते ,देविदास सोपान शिंदे,भागुराम धारुबा दवंडे या संचालकांची बिनविरोध निवड झाली.परंतू सर्वसाधारण कर्जदार मतदार संघात ८ संचालकांसाठी १३ नामनिर्देशन अर्ज आल्याने येथे २ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली.यामध्ये कृऊबास सभापती यांचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पँनल व पंडीतराव नखाते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष पँनल  मध्ये हि निवडणूक होत असल्याने हि निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची ठरली. सभापती अनिल नखाते यांनी पुर्णलक्षकेंद्रीत करुन सुयोग्य नियोजनात आपले वर्चस्व सिध्द केले.२ फेब्रुवारी रोजी येथे मतदान घेण्यात आले.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणुन पि.बी.राठोड तर केंद्राध्यक्ष एम.ए.लोणीकर तर कर्मचारी एस.एन.लोंढे, आर.बी.सोळंके, डि.एस.नखाते, सचिवकमलाकर सोळंके यांनी काम पाहिले
           या निवडणुकीत ५६८ मतदारांपैकी ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये २४ मतदान बाद ठरले गेले.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पँनलचे ८ संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.विजयी उमेदवारामध्ये अजिंक्य अनिलराव नखाते (३८०), शिवप्रसाद जोशी(३६५),भगवान झिंजान (३५३) ,गणेश नखाते (३६६),बाबासाहेब नखाते(३७०),रमेश नखाते (३४४),वर्धमान नखाते (३४०),शेख गुलाब (३०८) हे उमेदवार विजयी ठरले.
         तर निवडणूकीतील पराभुत उमेदवार व त्यांना पडलेली मते अरूण झिंजान (१००), भरत नखाते (१०९),भागीरथीबाई पंडित नखाते (९८), शिवाजी नखाते (७७),सुभाष नखाते (१३३).
         निवडणूक निकालानंतर  कृउबास चे सभापती अनिल नखाते व जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.यावेळी ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

    ● *युवा नेतृत्वाचा शुभारंभ....*
       या निवडणुकीत कृउबास चे सभापती अनिल नखाते यांचे चिरंजीव अजिंक्य नखाते हे सर्वाधिक ३८० मतांनी विजयी झाल्याने युवा नेतृत्वाच्या माध्यमातून अजिंक्य नखाते यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...