शेतात दारू पिण्यास विरोध केला शेतमालकास बेदम मारहाण; तिघांविरुद्ध पाथरी पोलिसात गुन्हा दाखल.
पाथरी:-तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये असणाऱ्या शेतात संध्याकाळच्या वेळी अवैधरित्या दारू पीत बसलेल्या व्यक्तींना शेतमाल मालकाने हटकले असता, शेतमालकालाच बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असुन यामध्ये मारहाण करून पळून जाणाऱ्या तिघांपैफी एकास पकडल्यामुळे या घटनेतील आरोपींवर पाथरी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाघाळा गाव शिवारामध्ये असणाऱ्या पारधी शेतवस्तीवर सेवानिवृत्त पोलीस शिपाई तुकाराम धारोजी पवार वय ६८ राहतात. शुक्रवारी संध्याकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान जेवण केल्यानंतर ते नित्य नियमाप्रमाणे शेतामध्ये फेरफटका मारण्यास निघाले होते यावेळी त्यांच्या शेतातील पाण्याच्या होता जवळ तिघेजण अवैधरित्या दारू पिताना आढळून आले यावेळी या तिघांना त्यांनी दारू पिण्यास विरोध केला यामुळे चिडलेल्या तिघांनी मिळून तुकाराम पवार यांना बेदम मारहाण केली यावेळी तुकाराम पवार यांच्या हातातील बॅटरी घेऊन त्यांच्या डोक्यात मारण्यात आल्याने त्यांनी आरडाओरड केली यावेळी वस्तीवर राहणारा त्यांचा मुलगा पंढरी पवार हा धावून आला आरडाओरडा होत असल्याने तिघांनी मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या धरपकडीमध्ये अंकुश वाघमारे नामक इसमास पंढरी पवार यांनी धरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये हजर केले असता पळून गेलेले केशव जावळे व कल्पेश गव्हाणे यांच्याविरुद्ध तुकाराम पवार यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा