शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

वाघाळा येथे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन,रक्तदान शिबिराचे होणार सुरुवात,कलामहोत्सव सह व्याख्यानांचे आयोजन

वाघाळा येथे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन.


रक्तदान शिबिराचे होणार सुरुवात.


कलामहोत्सव सह व्याख्यानांचे आयोजन.



पाथरी (प्रतिनिधी)तालुक्यातील वाघाळा येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवजयंती चे भव्य आयोजन करण्यात आले आहे .यावेळी तीन दिवसीय शिवजन्मोत्सव व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

   तालुक्यातील वाघाळा येथे छत्रपती शिवरायांचा ३७ वर्षापूर्वी
स्थापित अर्धपूर्णाकृती पुतळा असुन त्यामुळे या गावातील शिवभक्त मागील अनेक वर्षांपासून शिवजयंती अत्यंत थाटामाटात साजरी करतात. मागील पाच वर्षापासून यामध्ये कला महोत्सव व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची भर पडली आहे. त्यामुळे येथील शिवजयंती तीन दिवस साजरी करण्यात येते .या वेळीही १७ फेब्रुवारी पासून शिवजयंती महोत्सवात सुरुवात होणार आहे .प्रारंभी सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या दिवशी संध्याकाळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष व तहसीलदार परभणी, विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे . यावेळी पाथरीचे पोलिस निरिक्षक दिपक शिंदे , वनरक्षक व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पांडूरंग कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते अविनाश भारती यांचे शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. तर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी  दुपारी १ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये शिवचरित्रावर आधारित  चार विषयांवर जिल्हाभरातून आलेले लहान व मोठ्या  शालेय गटातील मुली व मुले भाषण करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ८ वाजता ह-भ-प शिवचरित्रकार संगीताताई व्यवहारे यांचा  प्रबोधन किर्तनाचे  आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी रुद्रभिषेक व त्यानंतर भव्य पालखी सोहळा आयोजित केला असून सायंकाळी सात नंतर सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. दरम्यान या महोत्सवामध्ये  सहभागी स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी या तीनदिवसीय शिवजन्मोत्सव यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक ,समस्त गावकरी मंडळी वाघाळा यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...