बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

सिलेंडरचे दर गगनाला: उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले

सिलेंडरचे दर गगनाला: उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले
पाथरी:-शहरात व ग्रामीण परिसरातील घरा घरात गरीब कुटुंबाना केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्वला गॅस योजनेतून मोठा गाजावाजा करून दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत सिलेंडर देण्यात आले. मात्र काही महिन्यातच सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सिलेंडरचे दर ९०० रुपये जवळपास झाल्याने आता उज्वला कनेक्शनधारक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गॅस ऐवजी घराघरातून धूर निघताना दिसत असून काही महिन्यातच योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
   गरीब महिलांनी कनेक्शन घेतले खरे काही महिनेच त्याचा वापर झाला. दुसरा सिलेंडर आणायचा म्हटले तर ९०० रुपये जवळपास लागत आहेत. उज्वला योजनेत समाविष्ट लाभार्थींना हा दर परवडणारा नसल्याने महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत.
  सर्वदूर पसरलेला दुष्काळ. गावात काम नाही. खिशात दाम नाही. अशा परीस्थितीत एकदाच ९०० रु सिलेंडरसाठी देणे शक्य नसल्याने गरीब जनता शेतातून तुराट्या, लाकूड जमा करत आहे. आता तर शेतात तुराटी भरपूर असल्याने महिला ‘नको ग माय एवढा म्हाग गॅस, धुर लागो कि डोळे लाल हो, हेच पैसे घर प्रपंचासाठी व लेकरांच्या शिक्षणासाठी कामाला येतील’ अशी भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
शासन वर्षाला बारा सिलेंडर देते. उज्वला योजनेतील गॅस धारकांना वर्षाला सहा सिलेंडर द्या मात्र एका सिलेंडरचा ३०० रु. दर स्थिर ठेवा. सरकारला खरोखरच गरीबांची काळजी असेल तर दोन महिन्याला एक गॅस सिलेंडर ३०० रूपये दराने द्यावा, अशी मागणी महिला करताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...