जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव यांचे प्रतिपादन .शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .पाथरी (प्रतिनिधी)"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, त्यासाठी मार्गदर्शन आणि कसलीही मदत करण्यास शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तत्पर राहू अशी ग्वाही जिल्हाचे खा . संजय जाधव यांनी दिलीते सार्वजनिक शिवजयंतीनिमित्य आयोजीत सत्कार व गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते .शिवसृष्टी प्रतिष्ठान व राजे संभाजी प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे शुक्रवार दि २१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजन केले होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी अजय चौधरी, सभापतीपदी गंगाप्रसाद आनेराव, दादासाहेब टेंगसे आणि पाथरी पंचायत समिती सभापतीपदी सौ.थोरात यांची निवड झाल्याबद्दल कानसुर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या .कार्यक्रमाला सुभाषआबा कोल्हे, विष्णू मांडे, सहसंपर्कप्रमुख प्रा.धोंडगे सर, माणिकअप्पा घुंबरे, उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आमले तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे व आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळीमोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात - खा . संजय जाधव ; शिवजयंतीचे औचित्य साधून कानसुर येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा