रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

*हादगांव बु सोसायटीवर सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व कायम,८ संचालकांचा मोठ्या मताधिक्याने विजय,५ संचालकांची बिनविरोध निवड*

हादगांव बु सोसायटीवर सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व कायम

८ संचालकांचा मोठ्या मताधिक्याने विजय

५ संचालकांची बिनविरोध निवड

पाथरी (वार्ताहर):-पाथरी तालुक्यातील हादगांव बु येथील राजकीय दृष्टीने लक्षवेधी ठरलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत कृऊबास चे सभापती अनिल नखाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पँनलचे ८ संचालक मोठ्या मताधिक्याने विजय झाले तर ५ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने येथे सभापती अनिल नखाते यांचे वर्चस्व सिध्द झाले.
                   हादगांव बु.विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक २ फेब्रुवारी रोजी पार पडली.या निवडणुकीत आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृउबास सभापती अनिल नखाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी प्रणीत शेतकरी विकास पँनलचे प्रकाश बोलाजी कदम,लक्ष्मीबाई आबासाहेब नखाते, अनिता बिबिशन नखाते ,देविदास सोपान शिंदे,भागुराम धारुबा दवंडे या संचालकांची बिनविरोध निवड झाली.परंतू सर्वसाधारण कर्जदार मतदार संघात ८ संचालकांसाठी १३ नामनिर्देशन अर्ज आल्याने येथे २ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली.यामध्ये कृऊबास सभापती यांचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पँनल व पंडीतराव नखाते यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष पँनल  मध्ये हि निवडणूक होत असल्याने हि निवडणुक राजकीय प्रतिष्ठेची ठरली. सभापती अनिल नखाते यांनी पुर्णलक्षकेंद्रीत करुन सुयोग्य नियोजनात आपले वर्चस्व सिध्द केले.२ फेब्रुवारी रोजी येथे मतदान घेण्यात आले.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणुन पि.बी.राठोड तर केंद्राध्यक्ष एम.ए.लोणीकर तर कर्मचारी एस.एन.लोंढे, आर.बी.सोळंके, डि.एस.नखाते, सचिवकमलाकर सोळंके यांनी काम पाहिले
           या निवडणुकीत ५६८ मतदारांपैकी ४७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये २४ मतदान बाद ठरले गेले.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शेतकरी विकास पँनलचे ८ संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.विजयी उमेदवारामध्ये अजिंक्य अनिलराव नखाते (३८०), शिवप्रसाद जोशी(३६५),भगवान झिंजान (३५३) ,गणेश नखाते (३६६),बाबासाहेब नखाते(३७०),रमेश नखाते (३४४),वर्धमान नखाते (३४०),शेख गुलाब (३०८) हे उमेदवार विजयी ठरले.
         तर निवडणूकीतील पराभुत उमेदवार व त्यांना पडलेली मते अरूण झिंजान (१००), भरत नखाते (१०९),भागीरथीबाई पंडित नखाते (९८), शिवाजी नखाते (७७),सुभाष नखाते (१३३).
         निवडणूक निकालानंतर  कृउबास चे सभापती अनिल नखाते व जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला.यावेळी ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.

    ● *युवा नेतृत्वाचा शुभारंभ....*
       या निवडणुकीत कृउबास चे सभापती अनिल नखाते यांचे चिरंजीव अजिंक्य नखाते हे सर्वाधिक ३८० मतांनी विजयी झाल्याने युवा नेतृत्वाच्या माध्यमातून अजिंक्य नखाते यांचा राजकीय प्रवास सुरू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...