मंगळवार, १ जानेवारी, २०१९

श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाकडून त्या एखंडे परिवारास मदतीचा हात

श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाकडून त्या एखंडे परिवारास मदतीचा हात

सोनपेठ  / प्रतिनिधी --माजलगाव येथील रामेश्वर एखंडे यांच्या पत्नीचे प्रसुतीदरम्यान मीरा रामेश्वर एखंडे व नवजात मुलगा यांचे निधन झाले. त्यांना सात मुली असून त्यांच्या या दुःखात सहभागी होत बेटी बचाव अभियान नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ यांच्या वतीने राबवले जाते, या मोहीमेअंतर्गत बावीस हजार रुपये दोन मुलींच्या नावे मुदती ठेव करण्यात आली.
नुकतेच माजलगाव येथे सौ. मिरा एखंडे प्रसुती साठी दाखल झाल्या असता तेथील डॉक्टर व परिचारिका यांच्या हलगर्जीपणा मुळे त्या माय-लेकांचा मृत्यू झाला असल्याचे कळाले,  त्यांच्या सात मुलीना आधार देण्यासाठी सोनपेठ जी.परभणी येथून श्री नंदिकेश्वर मठ संस्थान चे अध्यक्ष श्री गुरु 108 ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, सदस्य उमेशअप्पा नित्रूडकर, अखिल भारतीय विरशैव महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष तथा श्री महालीगेश्वर विद्यालय सचिव सुभाषअप्पा नित्रूडकर, प्रा.डॉ.संतोष रणखांब व पत्रकार किरण स्वामी सांत्वन करण्यासाठी माजलगाव येथील जिजामाता नगर येथील मानधने यांच्या निवास स्थानी दाखल झाले असता तेथील समाजाचे जेष्ठ सारंगअप्पा मिटकरी, प्रभाकर शेटे, ईश्वर खुर्पे, रमेश सवादे, पत्रकार सुहास बोराडे व परमेश्वर लांडगे आदीसह समाज भांधव मोठ्या संखेने उपस्थित होते, यावेळी श्री गुरु 108 ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी रामेश्वर एखंडे यांचे सात्वन करत येथील समाज बांधवाना या सात मुलीना आर्थिक मदतीचे आवाहन केले, समाज बांधवासह, सर्व पक्ष, सर्व समाज संघटना आदींनी मिळून शहरातून मदत फेरी काढून या सात मुली आपल्या मुली असे समजून फुल-ना-फुलाची पाकळी म्हणून आम्ही नुकत्याच संपन्न झालेल्या सप्ताहात दीपोत्सव कार्यक्रमातून जमा झालेली सोनपेठ शहर वासीयांच्या रक्कमेतून शिल्लक रकमेचा प्रथम एका मुलीस अकरा हजार रुपये मदत देण्याचा विचार होता परंतु येथे आल्यावर या लहान-लहान मुली पाहून शेवटच्या जुळ्या स्वरा व रागिणी या तीन वर्ष्याच्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी अकरा-अकरा हजार रुपये फिक्स-डीपॉजीट बॉंड आगामी मठ संस्थान च्या कार्यक्रमात रामेश्वर एखंडे यांना सपुर्त करणार असल्याचे सांगितले, पत्रकार सुहास बोराडे यांनी सांत्वन करताना समाज बांधवानी आता या सात मुली कडे आस्तेने पाहण्याची गरज असून सर्व प्रिंट मिडिया व इलेक्ट्रोनिक्स मिडिया आपल्या पाठीशी राहून मा.आ.आर.टी.देशमुख, पालकमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधून तसेच मुख्यमंत्री साहेबाना एका शिष्ठमंडळा द्वारे भेट देवून मदतीचे आवाहन करणार असल्याचे सांगितले. सुभाषअप्पा नित्रूडकर यांनी सांत्वन करून अखिल भारतीय विरशैव महासंघ मराठवाडा अध्यक्ष किरणजी सोनट्टक्के, मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, विरशैव समाज अध्यक्ष काका कोयटे आदींना प्राथमिक चर्चा झालेली असून या परिवाराची तयारी असल्यास मुलींचे पालकत्व स्वीकारण्याची अनेकांची तयारी असल्याचे सांगितले तसेच आमचे बंधू उमेशअप्पा नित्रूडकर व मी स्वतः सुभाषअप्पा नित्रूडकर या पैकी पाच मुलींच्या नावे 51 हजार रुपये प्रत्येकी फिक्स-डीपॉजीट बॉंड करून देणार असल्याचे सांगितले, प्रा.डॉ.संतोष रणखांब यांनी सांत्वन करून श्री नंदिकेश्वर मठ संस्थान अनेक गरजू मुलीना सतत "लेक वाचवा अभियानातून" मदत करत असते तसे आज येथे मदतीचा हात तसेच धीर देण्यासाठी आलेले गुरु 108 ष.ब्र.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी म्हणल्या प्रमाणे या आपल्या मुली आहेत असे समजून मदत करावी, यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात तसे धनादेश रामेश्वर एखंडे व त्या सात मुली हर्षदा-वय 16, तनुजा-वय 12, निहारिका-वय 10, अम्रिता-वय 08, धनश्री-वय 06 तसेच शेवटच्या जुळ्या स्वरा व रागिणी-वय 03 वर्ष यांना सपुर्थ केला अशा प्रकारे त्या एखंडे परिवारातील सात मुलीस सोनपेठ येथून प्रथम मदतीची साथ देण्यात आली असून समाज भांधावानी शहरात मदत फेरी द्वारे जी मदत होईल ती करण्याची गरज उपस्थितांनी बोलून दाखवली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...