गुरुवार, १० जानेवारी, २०१९

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ च्यावतीने विद्यार्थिनीस सायकल भेट

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ च्यावतीने विद्यार्थिनीस सायकल भेट

सोनपेठ(प्रतिनिधी) दि.११जानेवारी २०१९

बेटी बचाव, बेटी पढाव या वाक्यास अनुसरून परळी वैजनाथ येथील श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट ने सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनी कु.निकिता मस्के हीस सायकल भेट दिली.  अभ्यासात हुषार व होतकरू असलेली कु.निकिता हिची काही दिवसांपूर्वी सायकल हरवली होती; परिणामी तिने शाळेत जाने बंद केले होते. ही बाब ट्रस्टच्या सदस्यांना समजली, यावर उपाय म्हणून कु.निकिता हिस आज सायकल भेट दिली आहे.
ट्रस्टचे परळी वैजनाथ येथे वैजनाथाच्या दर्शनासाठी बाहेरगावाहून येनाऱ्या भक्तांसाठी अन्नछत्र चालू आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरीब व अनाथांना शिधा पुरविल्याजात असून या उपक्रमातून वेगवेगळ्या गावातील अनेक गरिब व निराधारांना आधार मिळाला आहे. याचबरोबर ट्रस्ट आरोग्यासाठी रूग्णांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मदतही पोहचवित आहे. शैक्षणिक उपक्रमात ट्रस्टने सोनपेठ तालूक्यातील मौ.वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीस ती शिकेल तिथपर्यंत चे शैक्षणिक पालकत्व स्विकारले असुन तीन वर्षांपासून तिला मदत पुरवठा होत आहे. वाचन संस्कृती जोपासलीजावी यासाठीही ट्रस्ट प्रयत्नरत असुन विविध उपक्रमात याबाबत जनजागृती करण्यात येऊन ग्रंथदानही करण्यात आले आहे.
सायकल वाटपाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी हे होते तर, ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी, कोषाध्यक्ष शिवराज उदगीरकर, सचिव संजय स्वामी, सदस्य सुरेश निलंगे, सा.सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक करतांना ट्रस्टचे सचिव तथा श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपीक संजय स्वामी यांनी उपस्थितांना ट्रस्टच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी व विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी यांनीही याप्रसंगी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल.जोशी, ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी, कोषाध्यक्ष शिवराज उदगीरकर, सचिव संजय स्वामी, सदस्य सुरेश निलंगे, सा.सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक एन.एम.निळे यांनी केले तर सहशिक श्रीकांत परळकर यांनी आभारप्रदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...