मंगळवार, १ जानेवारी, २०१९

आकरा ग्राम पंचायतींचा होणार कायापालट,नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधुन होणार विविध विकासकामे

*आकरा ग्राम पंचायतींचा होणार कायापालट*

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधुन होणार विविध विकासकामे

पाच वर्ष चालणार प्रकल्प.

पाथरी (वार्ताहर)
         महाराष्ट्र शासन व जागतिक बँक यांच्या वतीने  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत पाथरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीची निवड झाली असून या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांच्या  एकत्रीकरणाचा आराखडा तयार करून होणाऱ्या विकासकामातुन या ग्रामपंचायतीचा कायापालट होणार आहे अशी माहिती जि.प.उपाध्यक्षा सौ भावनाताई अनिलराव नखाते यांनी दिली आहे.
                    महाराष्ट्र शासन व जागतिक बँकेच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)  अंतर्गत गावचा  सर्वांगीण विकास करण्यासाठी निवड करण्याचे धोरण निश्चित केले आहे. पाथरी तालुक्यातील हादगाव बु , वरखडे ,किन्होळा ,खेर्डो ,सारोळा खु ,रेणाखळी ,वडी ,बादरवाडा    ,देवनाद्रा ,निवळी ,पाटोदा अशा ११ गावाची या पोकरा प्रकल्प मध्ये निवड करण्यात आली आहे
                         सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून कृषी, पंचायत समीती व ग्राम पंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान या प्रकल्पात राहणार आहे.हवामान आधारित या प्रकल्पाचे काम चालणार असून पाणलोट, ढाळीबांध , सिंचन विहीर  विहीर पुनर्भरण , कुकुटपालन ,शेळीपालन, मत्स्यपालन यासह विविध योजना एकत्रित करून त्याचा वैयक्तिक लाभ व सामूहिक लाभ अशा दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करून या आराखड्याला या प्रकल्पाअंतर्गत मंजुरी देण्यात येणार असुन हा प्रकल्प पाच वर्षापर्यंत चालणार आहे. या प्रकल्पा अंतर्गत विविध विकास कामे या ठिकाणी केली जाणार आहेत.दरम्यान या  गावाच्या विकास साधला जाणार असल्याने या गावचा कायापालट होणार आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल.
             या प्रकल्पामध्ये हादगांव बु सह ईतर गावाची निवड करणेसाठी जि.प.उपाध्यक्षा सौ भावनाताई नखाते ,कृउबासमीती सभापती अनिलराव नखाते यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातुन या गावाची निवड झाली आहे.


*टप्याटप्याने सर्व गावाचा सामावेश करण्यासाठी प्रयत्न.... सौ भावना नखाते.*
             गावचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण असुन निवड झालेल्या गावातील सरपंच यांनी अतिशय नियोजन पुर्वक या प्रकल्पाचा  लाभ घ्यावा तसेच टप्याटप्याने पाथरी तालुक्यातील ईतर गावाचा या प्रकल्पात सावावेश करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल असे जि.प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव  नखाते यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...