बुधवार, ९ जानेवारी, २०१९

जि.प.प्रा.शा.पोहेटाकळीच्या विद्यार्थ्यांनी गाजवीले मैदान,कबड्डीचा संघ मुलींचा केंद्रात प्रथम विजयी

जि.प.प्रा.शा.पोहेटाकळीच्या विद्यार्थ्यांनी गाजवीले मैदान
*कबड्डीचा संघ मुलींचा केंद्रात प्रथम विजयी*
पाथरी/प्रतिनिधी-जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे झालेल्या शाखा पाथरी केन्र्दाच्या केद्रस्तरीय स्पर्धामध्ये जिल्हा परिषद शाळा पोहेटाकळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धामध्ये यश संपादन केले. कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. तसेच वयक्तिक स्पर्धामध्ये इ.७वी ची विद्यार्थ्यांनी कु.शितल सुखदेव चव्हाण या विद्यार्थ्यांने लांब उडी या प्रकारात 15.3 फुट लांब उडी मारुन प्रथम पारीतोषिक मीळवले.तसेच खो-खो या स्पर्धेत पोहेटाकळी शाळेतील मुले व मुलींच्या संघानी द्वितीय क्रमांक पटकविला.त्याचबरोबर रीले या प्रकारातही मुले व मुलींनी द्वितीय क्रमांक पटकविला.तसेच 100मी धावने या प्रकारात कु.वैष्णवी भागवत मगर हीने द्वितीय क्रमांक मिळवीला.सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. फंड सर,शा.व्य.समीती अध्यक्ष उत्तम गोंगे,उपाध्यक्ष विलास गोंगे,भागवत कुल्थे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.या क्रीडास्पर्धासाठी सर्व शिक्षक परीश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...