राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वितांचा सन्मान सोहळा संपन्न
सौ.संजिवनी शिवाजीराव बोकन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित
सोनपेठ (प्रतिनिधी)
राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सोनपेठ, मानवत व पाथरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील यशस्वितांचा सन्मान सोहळा नुकताच पाथरी येथे ओंकार सेवाभावी संस्था पाथरी व राष्ट्रभक्ती संस्करण फाऊंडेशन पिंपरी चिंचवड जि.पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांतराव देशमुख तर माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, वीरपिता मारोतराव तेलभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात तालुक्यातील डिघोळ (दे.) येथील सौ.संजिवनी शिवाजीराव बोकन यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे पती सेवानिवृत्त नायब सुभेदार शिवाजीराव बोकन जेव्हा सैन्यात सेवेत होते; त्याकाळात त्यांनी डिघोळ सारख्या ग्रामिण भागात राहुन अतिशय चिकाटीने त्यांच्या तीन मुलांना घडविले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व संस्कारातून त्यांचा मोठा मुलगा सचिन शिवाजीराव बोकण एम.पी.एस.सी.च्या विविध क्षेत्रातील परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. सध्या तो महाराष्ट्र शासनाच्या अध्यापक विद्यालयात प्र.प्राचार्य पदावर सेवेत आहे. दुसरा मुलगा संदीप बोकण एम.पी.एस.सी.उत्तीर्ण असुन लवकरच तोही महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू होईल; तर तीसरा मुलगा व्यवसायीक आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हिम्मतीने सौ.बोकन यांनी त्यांचं आदर्श कुटुंब निर्माण केलं आहे. या कार्याबद्दल त्यांचा कांतराव देशमुख, माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, अभियंता नितीन चिलवंत, डॉ. जगदीश शिंदे या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले स्त्री रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सोनपेठ, मानवत व पाथरी तालूक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
रविवार, १३ जानेवारी, २०१९
सौ.संजिवनी शिवाजीराव बोकन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री रत्न पुरस्काराने सन्मानित
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा