सोमवार, १४ जानेवारी, २०१९

शिक्षण हक्क बचाव मोर्च्यास पाथरी तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलक सहभागी होणार_भिमराव उजगरे (ता.अध्यक्ष सं.वि.आंदोलन)

सम्यक विद्यार्थी आंदोलन परभणी जिल्हा आयोजित,
*शिक्षण हक्क बचाव मोर्च्यास पाथरी तालुक्यातुन हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलक सहभागी होणार_भिमराव उजगरे (ता.अध्यक्ष सं.वि.आंदोलन)*
पाथरी/प्रतिनिधी_सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर  दी १६ तारखेला बुधवार रोजी शिक्षण हक्क बचाव मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्च्यास पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी आंदोलक सहभागी राहणार असल्याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पाथरी तालुका अध्यक्ष भिमराव उजगरे यांनी दीली आहे.
  या मोर्चाचे नेतृत्व लखण सौंदरमल जिल्हाध्यक्ष परभणी हे करणार आहेत तर प्रमुख उपस्थिती दादाराव पंडीत जिल्हाध्यक्ष भारीप, विषेश उपस्थिती एन.जी.खंदारे आदींची उपस्थिती राहणार आहे.
  या मोर्चाच्या प्रमुख मागण्या २८०० शाळा बंद करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा,शिक्षक समायोजनाच्या नावाखाली ६००० शिक्षकांना बेरोजगार करण्याचा निर्णय घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा,१३०० बंद केलेल्या मराठी शाळ पुर्ववत करण्यात याव्यात,फेलोशिफ साठी NET परीक्षेची केलेली सक्ती रद्द करावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत देण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...