बुध्दाचे पहिले प्रवचन
१. सारनाथ येथे आगमन
१. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुध्दाने स्वत:लाच विचारले की, “सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देउ?” त्याला आलारकालाम याची आठवण झाली. बुध्दाच्या मते तो विद्वान, शहाणा, बुध्दीमान व बराच शुध्दाचरणी होता.”त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?” परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्याला सांगण्यात आले.
२. नंतर त्याने उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला. परंतु तोही मृत्यू पावला होता.
३. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजन नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालविली असतांना ते त्याच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते.
४. तो स्वत:शीच म्हणाला, “त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले. त्यांनी माझी सेवा केली. त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?’
५. त्याने त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. तेव्हा त्याला समजले की, ते सारनाथला इसिपतनच्या मृगदायवनात राहात आहेत. तेव्हा तो त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाला.
६. त्या पांच जणांनी जेव्हा बुध्द येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांनी ठरविले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला,”मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृध्दीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करत कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये, किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्याच्या साठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देउ. त्याची इच्छा असल्यास तो तेथे बसेल.” सर्वानी हे मान्य केले.
७. परंतु बुध्द जेव्हा त्यांच्याजवळ आला तेव्हा ते पाच परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुध्दाच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पात्र घेतले, एकाने त्याचे चीवर सांभाळले, एकाने त्याच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले.
८. खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते.
९. अशाप्रकारे जे त्याचा उपहास करणार होते ते त्याची पूजा करु लागले.
२. बुध्दाचे पहिले प्रवचन
१. परस्परांना अभिवादन करुन कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी भगवान बुध्दाला विचारले, “तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुध्दाने नकारात्मक उत्तर दिले.”
२. बुध्द म्हणाला, “जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे.”
३.”एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत.” दुसरा म्हणतो, “सर्व वासना मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत.” हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले.
४. भगवान बुध्द मध्यम मार्ग मानणारे होते- मज्जिम पतिमद- मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.
५. बुध्द परिव्राजकांना म्हणाला, “माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऎहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते. तोपर्यंत सर्व आत्मक्लेष व्यर्थच नाहीत काय?” ते उतरले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”
६. “जर तुम्ही आत्मक्लेशाचा मार्गाने आपला कामाग्नी शांत करु शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वत:ला कसे काय जिंकू शकाल?” त्यांनी उत्तर दिले, “आपण म्हणता ते बरोबर आहे.”
७. “जेव्हा तुम्ही स्वत:वर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हांला ऎहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या.”
८. “सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अध:पतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाही तर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारुपी प्रदीपही प्रज्वलीत राखू शकणार नाही.”
९. ’हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन अत्यंतिक टोके अशी आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करु नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या कामतृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषत: विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दु:खकारक, अयोग्य आणि हानिकारक आहे.”
१०. &quo१०. “ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानांत ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे.”
११. त्या पांच परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऎकले. भगवान बुध्दाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की, आपणाला आम्ही सोडून आल्यावार आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व भगवान बुध्दांनी त्यांना सांगितले.
१२. हे ऎकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुध्दाला प्रार्थना केली.
१३. भगवान बुध्दाने त्यांची विनंती मान्य केली.
१४. सुरुवातीलाच भगवान बुध्दाने त्याना सांगितले की, आपला जो मार्ग जो धम्म आहे त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही.
१५. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुध्दाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.
१६. बुध्दाने सांगितले की१६. बुध्दाने सांगितले की, आपल्या धम्माचे हे पहिली अधिष्ठान आहे.
१७. मनुष्यप्राणी दु:खात, दैन्यात आणि दारिद्र्यांत राहात आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दु:खाने भरले आहे, आणि जगातून हे दु:ख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही.
१८. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुध्दाच्या धम्माच्या पाया होय.
१९. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे.
२०.”खरोखर, हे परिव्राजक हो! जगातील दु:ख आणि त्या दु:खापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राम्हणांना(धर्मोपदेशकांना) हे समजत नाही ते माझ्या मते, श्रमण आणि ब्रम्हण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खराखरा अर्थ काय आहे? स्वत:ला श्रेष्ठ समजणा~यांना समजत नाही.”
२१. नंतर परिव्राजकांनी बुध्दाला विचारले, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि दु:ख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख करतो सांगा.”
२२. भगवान बुध्दाने सांगितले की, या धम्मानुसार जर प्रत्येकाने (१) पावित्र्याचा मार्ग अनुसरला (२) सदाचारणाचा मार्ग स्वीकारला आणि (३) शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दु:खाचा निरोध होईल.
२३.आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे.