मंगळवार, २८ मे, २०१९

पत्रकार मुळी कुटुंबावरील हल्लाप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी पाठविले निवेदन

मुळी कुटुंबावरील हल्लाप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी
मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी पाठविले निवेदन

जिंतूर :- तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्रीव  गृहमंत्री यांना निवेदन पाठवले आहे
           निवेदनात म्हटले आहे की येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी या पत्रकारांच्या कुटुंबावर 26 मे रोजी सकाळी सव्वा तीन वाजता अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून त्यांचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला ही बाब तात्काळ लक्षात आले पुढील अनर्थ टळला नसता कुटुंबातील सहा व्यक्ती ज्या घरात झोपल्या होत्या त्या खोलीला अज्ञातांनी आग लावली होती ही गंभीर घटना पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाला हादरा देणारी आहे या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करावी प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पी शिवशंकर, जिल्हा पोलीस प्रमुख उपाध्याय कृष्णकांत  उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले आहेत निवेदनावर राजाभाऊ नगरकर ,एम ए  माजिद,विजय चोरडिया, अकबर सिद्दिकी, मंचक देशमुख, नेमिनाथ जैन, गुणीरत्न वाकुडे,शेख अलीम, शेख वाजीद, ज्ञानेश्वर रोकडे गुलाबराव शिंदे, विनोद पाचपिल्ले, शकील अहमद, राहुल वाव्हळे,दिलीप देवकर, रियाज चाऊस, प्रदीप कोकडवार पठाण शहजाद,  विनोद जाधव , रामप्रसाद कंटाळे प्रवीण मुळी,रामदास आढे,   रमेश वाकळे, सचिन रायपत्रीवार,नितीन रोकडे, शंकर जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...