कृष्णा कांबळे यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना एन टीव्ही मराठी च्या वतीने पुरस्कार प्रदान
(दिनांक 5) समाजातील सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांच्या अडीअडचणींना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा कांबळे यांनी टीव्ही मराठी न्यूज च्या माध्यमातून पाथरी तालुक्यातील समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचं काम केले आहे त्यानिमित्ताने एन टीव्ही न्युज च्या 17 व्या वर्धापन दिना दिनानिमित्ताने त्यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला पत्रकारितेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडून आणि त्या समस्या शासनासमोर मांडून न्याय मिळवून देणारे तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे परभणी जिल्ह्यातील बोरगव्हान येथील तरुण पत्रकार कृष्णाजी कांबळे यांनी नावलौकिक मिळवला आहे महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या एन टीव्ही न्यूज मराठी चैनल कडुन सन्मान करण्यात आला त्यात सन्मानचिन्ह व सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक इकबाल शेख,आणि मान्यवरांच्या हस्ते दिनांक 2 मे रोजी अहमदनगर येथे 17 व्या वर्धापन दिनानिमित्ताने त्यांचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना कृष्णा कांबळे म्हणाले की समाजातील दुःखीकष्टी तसेच विविध बाबतीत वंचित असलेल्या लोकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी सदैव भूमिका असेल आपली पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही टिकविण्यासाठी त्याचा वापर आम्ही तालुक्यात करतो या करता आलेले विविध अडथळे न जुमानता आपली वाटचाल नेहमीच सुरू ठेवू असे स्पष्ट केले विधायक बाबी समोर आणून भ्रष्टाचारावर प्रहार करून व जनसामान्यांना त्रास देणाऱ्या व भ्रष्टाचारी लोकांचा कर्दनकाळ टीव्हीच्या माध्यमातून समाजासमोर आणू असे आपले मनोगत व्यक्त करताना एन टीव्ही मराठी पाथरी प्रतिनिधी यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमास एन टीव्ही न्युज मराठीचे मुख्य संपादक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्हा तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा