मंगळवार, ७ मे, २०१९

उपचारा दरम्यान मृत्यु पावलेल्या महीलेची ओळख पटेना,नागरीकांनी सहकार्य करण्याचे पोलीसांचे अवाहन

उपचारा दरम्यान मृत्यु पावलेल्या महीलेची ओळख पटेना...

----------------------------------------------------------

नागरीकांनी सहकार्य करण्याचे पोलीसांचे अवाहन

----------------------------------------------------------पाथरी ):-- पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका तीस वर्षीय महीलेचा महीण्या पुर्वी मृत्यु झाला असुन आज पर्यंत त्या महीलेची ओळख पटली नसल्या मुळे पोलीसांनी नागरीकांना ओळख पटवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

सविस्तर वृत असे कि पाथरी शहरातील नविन भाजी मंडी मध्ये एक महीला बेशुध्द अवस्तेत असल्याचे समजताच नागरीकांनी महिलेस शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये दि.३१/३/२०१९ रोजी उपचारासाठी दाखल केले होते. परंतु सदर महीलेचा उपचार चालु असतांनाच मृत्यु झालेचे ग्रामीण रुग्णालया मार्फत पाथरी पोलीसांना कळवले होते या वरुन पाथरी पोलीस स्टेशन चे गणेश शंकरराव गंभिरे हे तातडीने घटनास्थीळी दाखल झाले असता त्या ठिकाणी अंदाजे वय वर्ष 30,रंग सावळा, सडपातळ बांधा, डोक्याचे केस गळलेले, उंची मध्यम अंगावर गुलाबी रंगाचा टाॅप, हिरवा परकर अशा वर्णन सलेल्या एका महीलेचा मृत्यु देह शवच्छादन गृहा मध्ये ठेवण्यात आला होता या वरुन पाथरी पोलीसात ए.डी.क्र.५/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी नुसार अकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली असुन वरील वर्णनाच्या महीलेची काही माहीती असल्यास पाथरी पोलीस स्टेशन फोन.न. ०२४५१ २५५३३३ मो.८५५४८९७७०३ या क्रमांकावर कळवावे किंवा प्रतेक्ष भेटुन माहीती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे सदर घटनेचा अधीक तपास पो.नि.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी पोलीस जि.आर.कालापाहाड, जि.एम.वड, जि.एस.शेख हे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...