संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने किशोरी मुलींचे 40 जीवन कौशल्य सत्र उत्साहात संपन्न
पाथरी /प्रतिनिधी:-दिनांक (24 जून)संकप मानव विकास संस्थेच्या वतीने पाथरी तालुक्यातील ३१ गावे व मानवत तालुक्यातील ९ गावे अशा एकूण ४० गावातील किशोरीचे जीवन कौशल्य सत्र घेण्यात आले. या जीवन कौशल्य सत्रामध्ये संकल्प च्या वतीने समुदाय संघटक,अंगणवाडीताई,नर्स,आशाताई यांनी खालील विषयावर मार्गदर्शन केले। त्यात
अनेमिया या आजाराविषयी समज वाढवली,बालविवाह व त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली,किशोरी मुलींनी वयक्तिक स्वच्छता याविषयी कशी काळजी घ्यायची याची माहिती दिली,बालमजुरी व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.
या जीवन कौशल्य सत्रामध्ये संकल्प संस्थेचे कार्यकर्ते,किशोरी मुली,महिला, गावा-गावतील अंगणवाडी ताई,आशाताई,नर्स,यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता तो या प्रमाणे
किशोरी ७५१,महिला २१४,अंगणवाडी ताई ७४,नर्स ९,
आशाताई ७३,एकूण 1121 सहभागी होते .
या जीवन कौशल्य कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव गावातील किशोरी व महिलांना गावपातळीवर आरोग्य व पोषण च्या बाबतीत सक्षम बनवण्याचे काम संकल्प मानव विकास संस्थेच्या माध्यमातून होत आहे.याबद्दल किशोरी व महिला समाधान व्यक्त करत आहेत हे कौशल्य विकास सत्र संकल्प मानव विकास संस्थेचे कार्यकारी प्रमुख मा.सुधाकर क्षीरसागर याच्या मार्ग दर्शनाच्या खाली पार पडत आहे कौशल्य विकास सत्र यशस्वी करण्यासाठी संकल्पचे शंकर होगे सावन जोंधळे,सुरेश लालझरे,अंकुश कांबळे,सतीश तोडके, वैजेणाथ कसबे,सपना राठोड,प्रतिभा अंभोरे,निशा पंडित,अरुणा आठवले,पूजा गाढे,पूनम गाढे,राणी आवटे,रेशमा शेख यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा