सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,112 ठिकाणी परिस्थिती गंभीर.
राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले. तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने तोंड फिरवल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती बनली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येतहोती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यावेळी दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य तालुक्यांबाबतही माहिती दिली होती. त्यानंतर, आज राज्य सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८
सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,112 ठिकाणी परिस्थिती गंभीर
मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८
रेणुका शुगर्स ली.पाथरी बॉयलरचे अग्निप्रदीपन दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न.
रेणुका शुगर्स ली.पाथरी बॉयलरचे अग्निप्रदीपन दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न.
गळीत_हंगाम_2018
आज दि.29/10/2018 रोजी रेणुका शुगर्स ली.पाथरी बॉयलर चे आज उद्घाटन सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सदस्या जि.प.परभणी व मा.श्री.दादासाहेब टेंगसे माजी सभापती तथा उपाध्यक्ष रा.कॉ.साखर कामगार युनियन मराठवाडा यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी देवनांद्रा येथे जगदंबा देवीची विधिवत पूजा करून बॉयलर चे उदघाटन करण्यात आले याप्रसंगी मा.अजय थोरे प.स.सदस्य पाथरी,युनिट हेड शिवराज तेली,एचआर पी.एस.वेरुळकर,शेतकी अधिकारी पि.आर.पाटील,प्रोसेस चिफ केमिस्ट उमाकांत पौळ,स्टोअर किपर अनिल चौगुले,परम अवचार,रा.कॉ.मराठवाडा साखर कामगार युनियन चे सचिव शिवाजीराव शिंदे,कोषाध्यक्ष अशोक डासाळकर,सदस्य कल्याण देशमुख,बी.बी.म्हेत्रे,उद्धवराव नखाते,आर.एन.केंदळे,म.अदिल म.खाजा,एन.के.गायकवाड,एन.पी.आंबट,सेक्युरिटी ऑफिसर सोळंके साहेब व सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते
परभणी जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर निवड
परभणी जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर निवड
जिल्हाधिकारी पी.शिवशंकर करणार नाविण्यपूर्ण प्रकल्पाचे केंद्रीय समितीपुढे सादरीकरण
परभणी, दि. 29 :- शासनाच्या विभागांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती देणाऱ्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पाची सादरीकरणासाठी देशपातळीवर निवड करण्यात आली असून प्रशासकीय कामकाजात सुधारणांच्या दिशेने जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय सचिवस्तरीय समितीपुढे सादरीकरण करण्यात येणार आहे.यासाठी स्वत: जिल्हाधिकारी पी.शिवशंकर उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर असतील. यावेळी या प्रणालीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय करीत असलेल्या कार्यवाहीचे सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयातर्गत प्रशासकीय सुधारण आणि जनतेची गाऱ्हाणी विभागाच्यावतीने पूर्वी प्रस्ताव मागवण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या कामकाजाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत प्राप्त व्हावी या दृष्टीने अशा प्रणालीचे प्रस्ताव तयार केले आहे. याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केंद्र सरकारच्या विभागाकडे सादर केला होता.
जिल्हाधिकारी अशा प्रणालीचा अंशत: वापर करीत असून जिल्हा सुचना केंद्राच्यावतीने ही प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या ई-गव्हर्नन्सअंतर्गत या प्रकल्पाचा वापर सर्व ठिकाणी करावयाच्या दिशेने पावले टाकल्यास सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांना उपयुक्त ठरतील. तसेच याची व्याप्ती व परीणामकारकता वाढून जनतेच्या कामांना गती मिळेल प्रशासकीय कामकाजात गतिमानता येईल. संगणकीय प्रणालीच्या क्षमतेच्या वैशिष्ट्यांचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर केंद्रीय समितीपुढे सविस्तर सादरीकरण करतील.
बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८
खेळातुन मिळते शासकीय नौकरीची संधी----अनिल नखाते
खेळातुन मिळते शासकीय नौकरीची संधी....अनिल नखाते
सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त घेतल्या कबड्डी स्पर्धा..
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व साई क्रीडा मंडळ पाथरी यांचा उपक्रम
पाथरी ( वार्ताहर )
खेळाच्या माध्यमातून शारीरीक मानसिक व बौध्दिक विकास होऊन विचारात सकारात्मकता वाढीस लागते .एव्हढेच नव्हेतर खेळामधून प्रशासक घडतात त्यामुळे खेळातुन शासकीय नौकरी ची संधी मिळते असे मत कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाल्मीकि शिक्षण प्रसारक मंडळ परभणी व साई क्रीडा मंडळ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. क्रीडा महर्षी शंकरराव साळवी क्रीडांगण जायकवाडी वसाहत पाथरी येथे करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देतांना सभापती अनिलराव नखाते बोलत होते.स्पर्धेचे उद् घाटन व अध्यक्षस्थानी मुंजाजी भाले पाटील यांची उपस्थिती होती.तर ,प्रमुख आतिथी म्हणून माजी सभापती दादासाहेब टेंगसे ,जि.प. सदस्य कुंडलिकराव सोगे , पं. स. सभापती राजेश ढगे , माजी सभापती सुभाषराव कोल्हे ,कृउबास चे माजी सभापती माधवराव जोगदंड, पं.स.उपसभापती रमेश तांगडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम ,कृउबा संचालक नारायणराव आढाव ,विश्वांभर साळवे ,राधाकिशन डुकरे ,रफिक अन्सारी ,नगरसेवक सतिश वाकडे ,पं स.सदस्य धर्मराज हिवरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अनिलराव नखाते यांनी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत सर्व शाळा डिजीटल करण्याचा मानस बोलून दाखवला . व साई मंडाळाने केलेल्या स्पर्धा आयोजनाबद्दल आभार मानत यापुढे सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नखाते यांनी दिले.यावेळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.यावेळी उद् घाटनीय सामना वसंतराव नाईक क्रीडा मंडळ जिंतूर विरूध्द साई क्रिडा मंडळ पाथरी या संघात झाला.याप्रसंगी विविध संस्थेतील कर्मचाऱ्यांनी अनिलराव नखाते यांचा सत्कार केला.याप्रसंगी दादासाहेब टेंगसे ,मुंजाजी भाले पाटिल यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अनिलराव नखाते यांच्या कृतत्वावर आधारीत स्वरचीत कविताचे सादरीकरण रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले.
प्रास्ताविक किशन डहाळे यांनी केले तर सुत्रसंचालन टि.एस.शेळके यांनी केले.तर गोपाल आमले यांनी आभार मानले.प्रारंभी एल आर धोपटे ,गणेश शिंगणे यांनी स्वागतगित सादर केले .साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष भारत धनले यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८
पाथरी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन
*पाथरी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन*
सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा..
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व साई क्रीडा मंडळ पाथरी यांचा उपक्रम
पाथरी ( वार्ताहर )
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बहुमोल कार्य गौरव निमित्ताने वाल्मीकि शिक्षण प्रसारक मंडळ परभणी व साई क्रीडा मंडळ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. क्रीडा महर्षी शंकरराव साळवी क्रीडांगण जायकवाडी वसाहत पाथरी येथे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद घाटन आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंजाजी भाले पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.तर व्यासपीठावर सत्कारमूर्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते ,प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते, माजी सभापती दादासाहेब टेंगसे ,जि.प. सदस्य कुंडलिकराव सोगे , पं. स. सभापती राजेश ढगे , माजी सभापती सुभाषराव कोल्हे ,माजी जि.प.सदस्य चक्रधर उगले, बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जोगदंड, बाजार समितीचे उपसभापती एकनाथराव शिंदे ,पं. स. माजी सभापती तुकाराम जोगदंड, पं.स.उपसभापती रमेश तांगडे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ.भीमराव निर्वळ , खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम ,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी ६ वा. नगराध्यक्ष नितेश भोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यशस्वी संघातील खेळाडूंना न.प.चेे गटनेते जुनेद भैया दुराणी यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे याप्रसंगी उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी नगरसेवक शाकेर सिद्दिकी ,अलोक चौधरी, सतीश वाकडे, इरफान शेख,पं.स.सदस्य सदाशिव थोरात आदींची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडू व कबड्डी प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व साई क्रिडा मंडळातील पदाधिकारी यांनी केले आहे.
स्थालांतरीत पालकांच्या मुलांसाठी तातडीने हंगामी वस्तीग्रह सुरु करा
स्थालांतरीत पालकांच्या मुलांसाठी तातडीने हंगामी वस्तीगृह सुरु करा......
- सुधाकर क्षीरसागर –राज्य प्रमुख,बाल हक्क अभियान महाराष्ट्र व कार्यकारी संचालक,संकल्प मानव विकास संस्था
चालू वर्षी मराठवाडा विभागात अत्यअल्प पाऊस पडल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाप्रमाणे परभणी जिल्यातील मजूर उपजिवेकेसाठी जास्त संख्येने स्थलांतरीत होणार आहेत काही मजूर पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक येथे ऊसतोडणी साठी माहे आक्टोबर नोव्हेबर मध्ये स्थलांतरीत होणार आहेत. त्याच्यासोबत संकल्पच्या कार्यक्षेत्रातील 16 गावातून त्यांचे 834 मुलं स्थलांतरित होणार आहेत अशी संकल्प संस्थेने माहिती गोळा केली आहे. त्यानुसार संकल्प संस्थेने 834 शाळेतील मुलांना स्थालांतर होण्यापासून रोखण्यासाठी अभियान सुरु केलेले आहे. पालकांच्या बैठका ग्रह्भेटी, गाव बाल संरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व स्थलांतर होणारी मुलांबरोबर बैठका व चर्चा इत्यादी उपक्रम या अभियान अंतर्गत राबविले जात आहेत. 2009 च्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार शासनाकडे हंगामी वस्तीगृह सुरु करण्या बाबतचा पाठपुरावा संकल्प मार्फत मागील 9 वर्ष्यापासून करीत आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील काही मुलांना हंगामी वस्तीगृहात जेवणाची व्यवस्था होते.
परंतु मागील तीन वर्षापासून हंगामी वस्तीगृहाची सुरवात ही नोव्हेबर किवां डिसेंबर मध्ये प्रशासनाकडून केली जाते, त्यामुळे एक ते दिड महिना गावात थांबलेल्या मुलांनाच्या जेवणाची व्यवस्था नीटपणे होत नसल्याने त्यांची उपासमार होते व आई-वडील स्थलांतरीत झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढते.
चालू वर्षीच्या हंगामात संस्थेच्या पर्यंत्नामुळे 834 इतके मुलं गावात थांबवण्याचे संस्थेचे लक्ष्य आहे.
चालू हंगामात संकल्प संस्थेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी, परभणी, मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.परभणी, जिल्हा शिक्षणधिकारी [प्रा] परभणी, गट शिक्षणधिकारी,पाथरी, मानवत यांना हंगामी वस्तीग्रह सुरु करण्यासाठीचे निवेदन देऊन विनंती केलेली आहे.
तसेच बालकांच्या संरक्षण व काळजी साठी शासनाने एकात्मीक बाल संरक्षण यंत्रणा 2009 ला तयार केली त्या अंतर्गत परभणी जिल्हात जिल्हा बाल संरक्षण कक्ष मागील तीन वर्षा पासून अस्तित्वात नाही त्यामुळे बालंकाचे प्रश्न सोडवणुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.
म्हणून आम्ही संस्थेमार्फत या पत्रकार परिषद मध्ये अशीही मागणी करीत आहोत की तातडीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष पूर्ण पदांच्या भरती सह स्थापन करून कार्यरत करावे ज्यामुळे बालकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी गती मिळेल.
प्रत्येक मूल शिकलेले, संरक्षित, निरोगी, आनंदी, भयमुक्त आणि आरोग्यदायी हे स्वप्न घेऊन संकल्प मानव विकास संस्था मागील २० वर्षापासून परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सेलू तालुक्यातील स्थलांतर, मुलांचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण, व त्यांचे अधिकार या विषयावर काम करीत आहे. त्याच बरोबर महिलांचे आरोग्य आणि अधिकार या विषयावर काम करीत आहे. आमच्या या उपक्रमाची शासन व प्रशासनाने दखल घेऊन गरजू बालकांच्या न्याय व हक्कांचे संरक्षण व संवर्धन करावे असा आग्रह सुधाकर क्षीरसागर, (बाल हक्क अभियान महाराष्ट्रचे राज्य प्रमुख तथा संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक), प्रशासनाकडे धरीत आहेत.
या परीषदेस संकल्प संस्थेचे अध्यक्ष अशोक पंडीत, व कार्यकर्ते बालासाहेब खोपे, विठ्ठल साळवे,रामभाऊ हिवाळे, राजू साठे, प्रशांत क्षीरसागर, निर्मला राठोड, नंदा शेरकर, गबरू शिंदे, शंकर होगे, प्रतिभा अंभोरे, रेशमा शेख, सपना राठोड, जया भदर्गे व सावन जोंधळे उपस्थित होते.
सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८
भिमनगर पाथरी येथिल नागरीकांचे विविध मागण्यासाठी पाथरी तहसिल समोर अमरण उपोषन सुरु
भिमनगर येथील नागरीकांचे रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी आमरन उपोषन सुरु
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी शहरातील भिमनगर येथील नागरीकांना गेल्या ४० ते ४५ वर्षा पासुन कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ दिला नाही म्हणुन भिमनगर येथील नागरीकांना ताबडतोब रमाई आवास योजनेतील घरकुलाची अमल बजावनी करावी या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी परभणी यांना एका निवेदना द्वारे दिला होता परंतु आज पर्यत योग्य दखल न घेतल्या मुळे दि.१/१०/२०१८ पासुन सदर भागातील नागरीकांच्या वतीने अमरन उपोषन सुरु केले आहे
सविस्तर वृत असे कि पाथरी शहरातील भिमनगर येथील नागरीक गेल्या ४० ते ४५ वर्षा पासुन राहत आहेत परंतु सदर भागालील नागरीकांना जागेचा आज पर्यत मालकी हक्क दिले नाहीत सदर जागेचे मालकी हक्क नसल्याचे कारन दाखवुन या भागातील नागरीकांना कोन त्या ही घरकुल योजनेचा लाभ दिला गेला ना त्या मुळे भिम नगर येथील सर्व नागरीकांच्या वतीने परभणी येथील जिल्हाअधिकारी यांना दि.१९/०९/२०१८ एक निवेदन देण्यात आले होते त्या मध्ये भिमनगर येथील सर्व कबालेदार नागरीकांना त्या जागेचा मालकी हक्क देण्यात यावे व त्याच बरोबर सर्व भिमनगर येथील नागरीकांना रमाई आवास योजनेतील घरकुलांचे वाटप ताबडतोब करण्यात यावे या मागणीसाठी पाथरी येथील तहसिल कार्यालया समोर दि.०१/१०/२०१८ पासुन अमरन उपोषनाचे आंदोलन सुरु केले असुन त्या मध्ये शिवाजी ढवळे,शामराव ढवळे,आवडाजी ढवळे,लिंबाजी ढवळे,बाबासाहेब ढवळे,ज्ञानोबा ढवळे,मधुकर ढवळे,शेसेराव ढवळे,रवि ढवळे,समाधान वाकडे,सागर ढवळे,बाबुराव खंदारे,बंडु सवळे,विकास ढवळे,विश्वनाथ ढवळे,सुनिल ढवळे,मधुकर वाकडे,भिमनगर येथील नागरीकांचा रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी आमरन उपोषन सुरु
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...