सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

स्थालांतरीत पालकांच्या मुलांसाठी तातडीने हंगामी वस्तीग्रह सुरु करा


स्थालांतरीत पालकांच्या मुलांसाठी तातडीने हंगामी वस्तीगृह सुरु करा......
-                   सुधाकर क्षीरसागर –राज्य प्रमुख,बाल हक्क अभियान महाराष्ट्र व  कार्यकारी संचालक,संकल्प मानव विकास संस्था
          चालू वर्षी मराठवाडा विभागात अत्यअल्प  पाऊस पडल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षाप्रमाणे परभणी जिल्यातील मजूर उपजिवेकेसाठी जास्त संख्येने स्थलांतरीत होणार आहेत काही मजूर पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक येथे ऊसतोडणी साठी माहे आक्टोबर नोव्हेबर मध्ये स्थलांतरीत होणार आहेत. त्याच्यासोबत संकल्पच्या कार्यक्षेत्रातील 16 गावातून त्यांचे 834 मुलं स्थलांतरित होणार आहेत अशी संकल्प संस्थेने माहिती गोळा केली आहे. त्यानुसार  संकल्प संस्थेने  834 शाळेतील मुलांना स्थालांतर होण्यापासून रोखण्यासाठी अभियान सुरु केलेले आहे. पालकांच्या बैठका ग्रह्भेटी, गाव बाल संरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व स्थलांतर होणारी मुलांबरोबर बैठका व चर्चा इत्यादी उपक्रम या अभियान अंतर्गत राबविले जात आहेत. 2009 च्या  शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार शासनाकडे हंगामी वस्तीगृह  सुरु करण्या बाबतचा पाठपुरावा संकल्प मार्फत मागील 9 वर्ष्यापासून करीत आहोत. त्यामुळे जिल्ह्यातील काही मुलांना हंगामी वस्तीगृहात जेवणाची व्यवस्था होते. 
परंतु मागील तीन वर्षापासून हंगामी वस्तीगृहाची सुरवात ही नोव्हेबर किवां डिसेंबर मध्ये प्रशासनाकडून केली जाते, त्यामुळे एक ते दिड महिना गावात थांबलेल्या मुलांनाच्या जेवणाची व्यवस्था नीटपणे होत नसल्याने त्यांची उपासमार होते व आई-वडील स्थलांतरीत झाल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढते.
चालू वर्षीच्या हंगामात संस्थेच्या पर्यंत्नामुळे  834 इतके मुलं गावात थांबवण्याचे संस्थेचे लक्ष्य आहे.
चालू हंगामात संकल्प संस्थेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी, परभणी, मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.परभणी, जिल्हा शिक्षणधिकारी [प्रा] परभणी, गट शिक्षणधिकारी,पाथरी, मानवत यांना हंगामी वस्तीग्रह सुरु करण्यासाठीचे निवेदन देऊन विनंती केलेली आहे.
तसेच बालकांच्या संरक्षण व काळजी साठी शासनाने एकात्मीक बाल संरक्षण यंत्रणा 2009 ला तयार केली त्या अंतर्गत परभणी जिल्हात जिल्हा बाल संरक्षण कक्ष मागील तीन वर्षा पासून अस्तित्वात नाही त्यामुळे बालंकाचे प्रश्न सोडवणुकीसाठी अडचणी निर्माण होत आहेत.
म्हणून आम्ही संस्थेमार्फत या पत्रकार परिषद मध्ये अशीही मागणी करीत आहोत की तातडीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष पूर्ण पदांच्या भरती सह स्थापन करून कार्यरत करावे ज्यामुळे बालकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी गती मिळेल. 
प्रत्येक मूल शिकलेले, संरक्षित, निरोगी, आनंदी, भयमुक्त आणि आरोग्यदायी हे स्वप्न घेऊन संकल्प मानव विकास संस्था मागील २० वर्षापासून परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सेलू तालुक्यातील स्थलांतर, मुलांचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण,  व त्यांचे अधिकार या विषयावर काम करीत आहे. त्याच बरोबर महिलांचे आरोग्य आणि अधिकार या विषयावर काम करीत आहे. आमच्या या उपक्रमाची  शासन व प्रशासनाने दखल घेऊन गरजू बालकांच्या  न्याय व हक्कांचे संरक्षण व संवर्धन करावे असा आग्रह सुधाकर क्षीरसागर, (बाल हक्क अभियान महाराष्ट्रचे राज्य प्रमुख तथा संकल्प संस्थेचे कार्यकारी संचालक),  प्रशासनाकडे धरीत आहेत.   
या परीषदेस संकल्प संस्थेचे अध्यक्ष अशोक पंडीत, व कार्यकर्ते बालासाहेब खोपे, विठ्ठल साळवे,रामभाऊ हिवाळे, राजू साठे, प्रशांत क्षीरसागर, निर्मला राठोड, नंदा शेरकर, गबरू शिंदे, शंकर होगे, प्रतिभा अंभोरे, रेशमा शेख, सपना राठोड, जया भदर्गे व सावन जोंधळे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...