सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,112 ठिकाणी परिस्थिती गंभीर.
राज्य सरकारने 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच 112 तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही सरकारने आपल्या परिपत्रकात म्हटले. तर राज्यातील 39 तालुके मध्यम दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने तोंड फिरवल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती बनली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही सातत्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येतहोती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील पालकमंत्र्यांना दुष्काळी दौरा करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, पालकमंत्र्यांनी दुष्काळी दौरा करुन त्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर, 180 तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, राज्य सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यावेळी दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य तालुक्यांबाबतही माहिती दिली होती. त्यानंतर, आज राज्य सरकारकडून राज्यातील 151 तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे.
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८
सरकारकडून 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर,112 ठिकाणी परिस्थिती गंभीर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा