मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

परभणी जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर निवड

परभणी जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर निवड

   जिल्हाधिकारी पी.शिवशंकर करणार नाविण्यपूर्ण प्रकल्पाचे केंद्रीय समितीपुढे सादरीकरण      

परभणी, दि. 29 :- शासनाच्या विभागांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती देणाऱ्या परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नाविण्यपूर्ण प्रकल्पाची सादरीकरणासाठी देशपातळीवर निवड करण्यात आली असून प्रशासकीय कामकाजात सुधारणांच्या दिशेने जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या प्रयत्नांचा हा सन्मान आहे.
नवी दिल्ली येथे केंद्रीय सचिवस्तरीय समितीपुढे सादरीकरण करण्यात येणार आहे.यासाठी स्वत: जिल्हाधिकारी पी.शिवशंकर उपस्थित राहणार असून त्यांच्या समवेत जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर असतील. यावेळी या प्रणालीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय करीत असलेल्या कार्यवाहीचे सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयातर्गत प्रशासकीय सुधारण आणि जनतेची गाऱ्हाणी विभागाच्यावतीने पूर्वी प्रस्ताव मागवण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या कामकाजाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत प्राप्त व्हावी या दृष्टीने अशा प्रणालीचे प्रस्ताव तयार केले आहे. याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केंद्र सरकारच्या विभागाकडे सादर केला होता.
जिल्हाधिकारी अशा प्रणालीचा अंशत: वापर करीत असून जिल्हा सुचना केंद्राच्यावतीने ही प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या ई-गव्हर्नन्सअंतर्गत या प्रकल्पाचा वापर सर्व ठिकाणी करावयाच्या दिशेने पावले टाकल्यास सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांना उपयुक्त ठरतील. तसेच याची व्याप्ती व परीणामकारकता वाढून जनतेच्या कामांना गती मिळेल प्रशासकीय कामकाजात गतिमानता येईल. संगणकीय प्रणालीच्या क्षमतेच्या वैशिष्ट्यांचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर केंद्रीय समितीपुढे सविस्तर सादरीकरण करतील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...