खेळातुन मिळते शासकीय नौकरीची संधी....अनिल नखाते
सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त घेतल्या कबड्डी स्पर्धा..
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व साई क्रीडा मंडळ पाथरी यांचा उपक्रम
पाथरी ( वार्ताहर )
खेळाच्या माध्यमातून शारीरीक मानसिक व बौध्दिक विकास होऊन विचारात सकारात्मकता वाढीस लागते .एव्हढेच नव्हेतर खेळामधून प्रशासक घडतात त्यामुळे खेळातुन शासकीय नौकरी ची संधी मिळते असे मत कृउबास चे सभापती अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाल्मीकि शिक्षण प्रसारक मंडळ परभणी व साई क्रीडा मंडळ पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. क्रीडा महर्षी शंकरराव साळवी क्रीडांगण जायकवाडी वसाहत पाथरी येथे करण्यात आले.यावेळी सत्काराला उत्तर देतांना सभापती अनिलराव नखाते बोलत होते.स्पर्धेचे उद् घाटन व अध्यक्षस्थानी मुंजाजी भाले पाटील यांची उपस्थिती होती.तर ,प्रमुख आतिथी म्हणून माजी सभापती दादासाहेब टेंगसे ,जि.प. सदस्य कुंडलिकराव सोगे , पं. स. सभापती राजेश ढगे , माजी सभापती सुभाषराव कोल्हे ,कृउबास चे माजी सभापती माधवराव जोगदंड, पं.स.उपसभापती रमेश तांगडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम ,कृउबा संचालक नारायणराव आढाव ,विश्वांभर साळवे ,राधाकिशन डुकरे ,रफिक अन्सारी ,नगरसेवक सतिश वाकडे ,पं स.सदस्य धर्मराज हिवरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अनिलराव नखाते यांनी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत सर्व शाळा डिजीटल करण्याचा मानस बोलून दाखवला . व साई मंडाळाने केलेल्या स्पर्धा आयोजनाबद्दल आभार मानत यापुढे सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नखाते यांनी दिले.यावेळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते.यावेळी उद् घाटनीय सामना वसंतराव नाईक क्रीडा मंडळ जिंतूर विरूध्द साई क्रिडा मंडळ पाथरी या संघात झाला.याप्रसंगी विविध संस्थेतील कर्मचाऱ्यांनी अनिलराव नखाते यांचा सत्कार केला.याप्रसंगी दादासाहेब टेंगसे ,मुंजाजी भाले पाटिल यांनी मार्गदर्शन केले.यावेळी अनिलराव नखाते यांच्या कृतत्वावर आधारीत स्वरचीत कविताचे सादरीकरण रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले.
प्रास्ताविक किशन डहाळे यांनी केले तर सुत्रसंचालन टि.एस.शेळके यांनी केले.तर गोपाल आमले यांनी आभार मानले.प्रारंभी एल आर धोपटे ,गणेश शिंगणे यांनी स्वागतगित सादर केले .साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष भारत धनले यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.
बुधवार, १० ऑक्टोबर, २०१८
खेळातुन मिळते शासकीय नौकरीची संधी----अनिल नखाते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा