सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

पाथरी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन

*पाथरी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन*

सभापती अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा..

वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व  साई क्रीडा मंडळ पाथरी यांचा उपक्रम

पाथरी ( वार्ताहर )
          पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव  नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे बहुमोल कार्य गौरव निमित्ताने  वाल्मीकि शिक्षण प्रसारक मंडळ परभणी व साई क्रीडा मंडळ पाथरी  यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा व सत्कार समारंभाचे आयोजन ९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ११ वा. क्रीडा महर्षी शंकरराव साळवी क्रीडांगण जायकवाडी वसाहत पाथरी येथे आयोजन करण्यात आले आहे.
                 या स्पर्धेचे उद घाटन  आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंजाजी भाले पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.तर व्यासपीठावर  सत्कारमूर्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते ,प्रमुख उपस्थिती म्हणून जि. प.उपाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते, माजी सभापती दादासाहेब टेंगसे ,जि.प. सदस्य कुंडलिकराव सोगे , पं. स. सभापती राजेश ढगे , माजी सभापती सुभाषराव कोल्हे ,माजी जि.प.सदस्य चक्रधर उगले, बाजार समितीचे माजी सभापती माधवराव जोगदंड, बाजार समितीचे उपसभापती एकनाथराव शिंदे ,पं. स. माजी सभापती तुकाराम जोगदंड, पं.स.उपसभापती रमेश तांगडे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष डॉ.भीमराव निर्वळ , खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम ,जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.
                   या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सायंकाळी  ६ वा. नगराध्यक्ष नितेश भोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यशस्वी संघातील खेळाडूंना न.प.चेे गटनेते जुनेद भैया दुराणी यांच्या हस्ते बक्षीस वितरीत  करण्यात येणार आहे याप्रसंगी उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी नगरसेवक शाकेर सिद्दिकी ,अलोक  चौधरी, सतीश वाकडे, इरफान शेख,पं.स.सदस्य  सदाशिव थोरात आदींची उपस्थिती राहणार आहे.
        या स्पर्धेसाठी खेळाडू व कबड्डी प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ व साई क्रिडा मंडळातील पदाधिकारी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...