मंगळवार, ११ जून, २०१९

केळीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

केळीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

पाथरी -प्रतिनिधी

पाणी कमी पडल्यामुळे व ४जुन रोजी वादळी वाऱ्यामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी पोहेटाकळी येथील शेतकरी दत्ता सुंदरराव गोंगे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी याच्याकडे केली आहे. 

  दत्ता गोंगे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोहेटाकळी शिवारात गट न.११८ मध्ये मला १ हेक्टर २८ आर जमीन असुन मी जुन २०१८ मध्ये जमीनीची मशागत करून टिश्युकल्चर जातीच्या केळीची लागवड केली होती. याची खत घालुन मशागत केल्यामुळे केळीचा जोमदार फड आला होता.पण गेल्या विस दिवसापासून पाणी कमी पडत असल्यामुळे केळीचे नुकसान होत होते.त्यातच ४ जुन रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रति सर्व संबधिताना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...