शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहील्यावर प्रकार उघडकीस;पाथरी पोलीसात गुन्हा दाखल*

*मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; गर्भवती राहील्यावर प्रकार उघडकीस;पाथरी पोलीसात गुन्हा दाखल*
पाथरी--पाथरी तालूक्यातील बांदरवाडा येथिल एका मतिमंद आणि अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.पीडीत मुलगी गरोदर राहिलेल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने पाथरी तालुक्यात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात तिघाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.गंगाधर आप्पाराव नरवडे; बाबासाहेब तातेराव शेळके (रा.ह.मु.बांदरवाडा ता.पाथरी) दामोदर मधुकर साळवे(रा.बांदरवाडा या.पाथरी)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पाथरी पोलीस ठाण्यात तिघाविरुध्द तक्रार दाखल केली आहे.
     पीडीत मुलीच्या आजीने दीलेल्या फीर्यादी नुसार आरोपी हे त्यांच्या कडे असलेल्या जनावरांना पाणी पाजण्याच्या बहाण्याने फीर्यादी यांच्या मळ्याजवळ असलेल्या ओढ्यावर येत होते.आरोपी जनावरांना पाणी पाजण्याच्या बहाण्याने मळ्यामध्ये टवाळकी करत राहायचे; आरोपी हे त्यांच्या अपंग व मतीमंद मुलीला खायला देवुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे हे फीर्यादींचा लक्षात आल्यावर त्यांनी आरोपींना ताकीद दिली होती.
  दरम्यान फीर्यादी यांच्या पतीची शश्त्रक्रीया करण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या त्या संधीचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केले.पीडीत मुलगी पाच महीण्याने गरोदर राहिलेल्याने हा प्रकार उघडकीस आला.पीडीत मुलीच्या आजीने पाथरी पोलीस ठाण्यात तिघाविरुध्द तक्रार दील्यानंतर पाथरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच पीडित मुलीला गुरुवार(२/११/२०१८)रोजी वैद्यकीय तपासणीसाठी परभणी येथे पाठवण्यात आले आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका वागळे या करीत आहेत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...