परभणी येथील टि व्ही नाईन या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी शेख सलीम यांचे आज (दि-२१)रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हैद्राबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. मृत्यु समयी त्यांचे वय (४२)वर्ष होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे समजले आहे.

त्यांच्या अचानक निधनाने पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच स्नेही परिवार जनात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख सलीम यांच परभणी जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आई-वडील एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.

उद्या सकाळी परभणी येथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळाले आहे.