बुधवार, ३१ जुलै, २०१९

संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने उमरा येथे आरोग्य शिबिर संपन्न

*संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने उमरा येथे आरोग्य शिबिर संपन्न *
 आरोग्य शिबिर संकल्प मानव विकास संस्थेच्या वतीने दि 27/7/रोजी घेण्यात आला .सदरील 
शिबिराची सुरवात जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. नंतर संस्थेचे समन्वयक विठ्ल साळवे यानी प्रस्ताविक केले, तर सतीश तोड़के यानी सूत्र संचलन केले,या नंतर प्रत्यक्ष लोकांची आरोग्य तपासणी करून त्याना औषधउपचार देण्यात आले.
या आरोग्य शिबिरात डॉक्टर रमेश क्षीरसागर  यानी 288  रुग्णाची तपासणी केली.
या आरोग्य शिबिरा मध्ये उमरा ,अंधापुरी,गौंडगांव येथील किशोरी मुली, गरोदर मातां,  स्तनदा माता व इत्तर लोकांचीही तपासणी करण्यात आली 

रुग्णाची असे एकुण 288 रुग्णाची तपासणी करुन त्याना औषध वाटप करण्यात आले.

या आरोग्य शिबिरा मद्धे रुग्ण तपासणी बरोबरच किशोरवींन मूली,गरोदर माता व इत्तर रुग्ण असे ऐकून 41 लोकांची रक्त तपासणी ही करण्यात आली.

डॉ. रमेश क्षीरसागर व बाभळगाव PHCचे पवार एम.बी.आरोग्य सहाय्यक,ANM पारडे मँडम MPW पंडीत, MPW, अजबे .व ,Lab Technicianसुधाकर कुकडे सर ,दिवान सर अंगणवाडीताई वर्षा कोल्हे, सुनीता रोडगे ,व बेबीताई साळवे. सुनिता हजारे व सुरेश कोल्हे ,गणेश कोल्हे हे उपस्थीत होते.
आरोग्य शिबिर सम्पन करण्यासाठी   संकल्प संस्थेचे  बाळासाहेब खोपे, विठ्ल साळवे ,सतीश तोड़के , प्रतिभा अभोरे, सुरेश लालझरे , अरुणा आठवले, पुजा गाडे, अन्कुश कांबळे,  ,निशा पंडीत,राणी आवटे,पुजा कदम ,वैजेनाथ  कसबे यानी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...